इंडिया आघाडीचं ठरलं: राहुल गांधींच्या निवासस्थानी चाय पे चर्चा, लढाई सुरूच राहणार

नवी दिल्ली: मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससह इंडिया आघाडीचे दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. यसाच आंदोलनाची पुढील रननिती ठरवण्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी चाय पे र्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. ही बैठक संपल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. बैठकीस राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, टी. राजा, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या नेहा बोरा यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
निवडणुक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत ज्ञानेश कुमार हे मोदी सरकारसाठी काम करत आहेत. एसआयरच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांनी मोदी सरकारला मदत केल्याचे आता जवळपास निश्चित झाले असून लोकशाहीचा गळा घोटणार्या ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी लढाई सुरूच राहणार असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. या आंदोलनामध्ये समविचारी पक्ष संघटनांसह शेतकरी संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटनांही सहभागी होणार असून लोकशाही वाचचण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक या लढाईत सामिल होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
मुख्य निवडणुक आयुक्त माफिया- संजय राऊत: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत, माफियांची कसं लढायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे. असा इशारा देत खासदार संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले.
संविधानाची हत्या झालीय-सुप्रिया सुळे: आपल्या देशाच्या संविधानाची हत्या झाली असून आज संविधान धोक्यात आहे.त्यासाठी आमची लढाई सुरूच राहणार आहे. आम्ही आंदोलन करत राहू, बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे. पण एक व्यक्ती आणि एक सरकार त्याला पायदळी तुडवण्याचे काम करत आहे, अशी घणाघाती टिका सुप्रिया सुळे यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम हेच आमचे मिशन- राहुल गांधी: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे म्हटले. आता मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा हेच आमचे मिशन असल्याचे ते म्हणाले. मतचोरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचा हिशेब घेतला जाईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
लोकशाहीची हत्या करण्यात आली असून, आता लोकशाही वाचवणे हेच आमचे ध्येय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी, ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांना सोडणार नाही, असा गंभीर इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
ं



Comments