top of page


बारामतीत 6 तर राहुरीतील चार उमेदवारांनी घेतली माघार पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी; पार्थ पवार पाठोपाठ नितेश राणेंचा काँग्रेसवर निशाना
बारामती/ राहुरी: राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका धेतल्याने बारामतीत पोटनिरवडणुक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दिवशी आणखी काही घडामोडीची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. त्यातच आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील रा
Apr 82 min read


बारामती पोटनिवडणुक बिनविरोधाची आशा धुसरच ! सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात; आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज दाखल
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होईल असा कयास होता, अजितदादांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाबद्दल प्रचंड सहानुभूतीमुळे जवळपास ही पोटनिवडणुक बिनविरोध होणार तसे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने संकेत दिले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामती पोटनिवडणुकीची बिनविरोधची अशा मावळली आहे. बारामती विधानसभेची पो
Apr 52 min read


महिनाभरात राज्यभर मोफत विज, गोव्यात अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
पणजी/ पोंडा: आम आदमी पार्टीने गोव्यातील पोेंडा पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल यांनी पोंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश यांच्या समर्थनार्थ एका ‘परिवर्तन सभे’ ला संबोधित केले. त्यांनी गोव्याच्या जनतेला थेट आवाहन केले, “ 2027 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ ला संधी द्या, आणि आमचे सरकार स्थापन होताच, आम्ही एका महिन्यात संपूर्ण गोव्यात विज मोफत करण्याचे अश्वासन अरविंद केजीरीवाल यांनी यावेळी दिले. पोेंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्य
Apr 22 min read


पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार? कोरोनासारखं संकट, सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
नवी दिल्ली: मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून, देशाच्या सुरक्षेसह आर्थिक आणि सामाजिक परिणामांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. मध्य-पूर्वेतील संघार्षामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली आहे. तेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार, व्यापार साखळीतील अडथळे, तसेच भारतीय न
Mar 261 min read


आखाती देशातील युध्दाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती कोरोनासारखी एकजूट दाखवावी लागेल; आता पुन्हा सज्ज राहण्याचे अवाहान
नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने भारतासमोरही आव्हान उभे केले आहे. प्रामुख्याने इंधन तुटवड्याबाबत भारतकाडून चिंता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सोमवारी लोकसभेत देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या युध्दाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना भारत आव्हानांचा सामना करणसाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेचत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी डिप्लोमसीबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले सुरुवातीपासू
Mar 232 min read


काँग्रेसचा भाजपाला धक्का; राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजप आणि शिवसेना इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षाची ताकद वाढवत असायचे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळी तर महाविकास आघाडीच्या पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्रवेश देत आपल्या पक्षाची ताकद वाढवली. काँग्रेसने भाजपला आणि शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
Mar 162 min read


निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या दीड तास आधीच, ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या दीड तास आधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजारी आणि मुएझिन (प्रार्थनेसाठी अजान देणारे) यांच्या मानधनात 500 रुपये ने वाढ केली. आता त्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी एका पोस्टमध्ये लिहिले की, “ समुदायांचे आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन राखण्यात पुजारी आणि मुएझिन महत्वाची भूमिका बाजावतात. सरकारने मानधन योजनेअंतर्गत पुजारी आणि मुएझिनसाठी सर्व नवीन अर्जांना मान्यता दिली आहे. ममता बॅनर्
Mar 152 min read


पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
नवीदिल्ली : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली, पाच राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील
Mar 152 min read


राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
मुंबई: महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे . ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून , शिवसेना शिंदे गटाकडून एक, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते यांचे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ
Mar 51 min read


मविआकडून शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा
मुुंबई: उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वत: शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवास्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यात आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करून महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावास पाठिंबा असल्याचे सुचवले आहे. त्यामुळे शरद पवार हेच महाविकास आघडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Mar 42 min read


भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, अनेक हायप्रोफाइल चेहर्यांना डच्चू; आठवले कम बॅक, विनोद तावडेंना संधी, दोन उमेदवारांचे धक्कातंत्र
मुुंबई : भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेत 4 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातील आठवले आणि तावडे यांना उमेदवारी अपेक्षीत होती. पण इवनाते आणि वडकुते यांच्या उमेदवार्या धक्कातंत्र मानले जात आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी 25 नावांची यादी कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम करण्यात आली होती. स्वत: प्रदेशाध्यक्ष रवी
Mar 42 min read


उद्धव ठाकरे विधान परिषदेवर तर शरद पवार राज्यसभेवर जाणार? परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला? महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
मुंबई: 6 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यसभेसाठी महायुतीकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, शरद पवार राज्यसभेवर जाणार तर परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार राज्यसभेव
Feb 251 min read


कर्नाटकात नेतृत्व बदलाचे वारे, मुख्यमंत्री सिद्धरामैया विरोधात आमदार एकवटले
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामैया आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी नेतृत्व बदलाची उघडपणे मागणी केली आहे. डी.के. शिवकुमार 26 फेब्रूवारी रोजी दिल्लीमध्ये पक्षाच्या हायकमांकडची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लिंगायत आणि वोक्कालिगा मतदारांना सांभाळण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे आहे. रविवारी (दि.22) काँग्रेस आमदार एच.ए.इक्बाल हुसेन यांनी नेतृत्व बदलाच्या मागणीला दुजोरा
Feb 221 min read


भाजपचं राज्यसभेसाठी धक्कातंत्र, विनोद तावडेंच्या नावाची चर्चा!
राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये सध्या विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे, सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा आहे. धैर्यशील पाईल हे पोटनिवडुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. याशिवाय भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. शिवसेनेतून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. निवडणूक अ
Feb 192 min read


शिवनेरीवर अजितदादांच प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त झाले - मुख्यमंत्री फडणवीस
पुणे : अजितदादाचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती क, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू, मला सांगताना आनंद वाटतोय की, पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्स सोहळा शिवनेरी येथे पार पडला. या कार्यक्रमातून ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भारताचा भूगोल
Feb 192 min read


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीना घरात घुसून गोळ्या घालण्याची भाजपच्या पदाकिार्याची धमकी
काँग्रेसच्या 25 खासदारांनाही धमकी; काँग्रेससह समविचारी पक्षांकडून निषेध नवीदिल्ली: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजप आणि करणीसेनेच्या एका पदाधिकार्याने सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू ’ अशी धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या 25 खासदारांना देखील त्याने धमकी दिली आहे. या व्हिडीओमुळे मिडीयावर खळबळ उडा
Feb 192 min read


तेलंगणात ‘स्थानिक’ निवडणुकीत भाजपचा धुव्वा! ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान, काँग्रेसची मुसंडी; राहुल गांधींच मोठं विधान..
तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे त्या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत मतचोरिच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोध पक्षांनी निवडणूक अयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निरवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भजापला
Feb 142 min read


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सभागृहात सत्ताधार्यांना घाम फोडणार्या राहुल गांधी विरोधात भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मांडला प्रस्ताव
नवी दिल्ली : यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधारी एनडीए ला जेरीस आणून सोडलं आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांमुळे अनेकदा लोकसभाच कामकाज तहकुब करावं लागलं होतं. त्यानंतर कालच्या अपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप करत यांनी देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत सरकारवर घणाघाती टीका केली होती. यापार्श्वभूमीवर राहुल गांधीविरोधात सत्ताधारी एनडीएच्या खासदारांकडून अपात्रतेचा प्रस्ताव आण
Feb 122 min read


पेंग्विन इंडिया खोटं बोलत आहे,..मला लष्करप्रमुख नरवणे यांच्यावर विश्वास - राहुल गांधी
नवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांचे आत्मचरित्र “ फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी” ने देशात अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण केला आहे. संसदेपासून रस्त्यांपर्यंत या गोंधळाच्या केंद्रस्थानी राहुल गांधी यांनी सभागृहात पुस्तकाची प्रत दाखवून त्याला “ सत्याचा दस्तऐवज ” असे संबोधून स्वत:ला दूर करत असताना, जनरल नरवणे यांच्या जुन्या सोशल मीडिया पोस्टने हा दावा उघड केला आहे. या विषयावर प्रश्न असा आहे की, जर पुस्तक प्रकाशित झालेच नसेल, तर माजी लष्करप्रमुखांनी स्वत:त्याच्या “ उपलब
Feb 102 min read


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला: अजिदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळेच भावूक ; पार्थ पवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. 10 फेब्रूवारी 2026 रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबद
Feb 101 min read
bottom of page