पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केंद्रीय निवडणुक अयोगाची घोषणा; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

नवीदिल्ली : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरल राज्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली, पाच राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत असून 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञाणेश कुमार पत्रकार परिषदेत म्हणाले की, माझ्या प्रिय मतदारांनो, गेल्या काही दिवसात निवडणूक अयोगाने सर्व राज्यांचा दौरा केला, तयारीचा आढावा घेतला आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेतली. त्यांच्या सुचनांचा स्वीकार केला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आयजी, डिजी यांची भेट घेतली. प्रशासनाने एसआयआर साठी केलेल्या कामगिरिबद्दल बीएलओंचे अभिनंदन केल्याचं ज्ञाणेश कुमार म्हणाले. निवडणुका होत असलेले पाचही राज्य भौगोलिक आणि सांस्कृतिक भारताच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करतात, असे म्हणत त्यांनी मतदारसंख्या आणि मतदान कर्मचारी, यंत्रणाबाबत महिती दिली.
पुढे बोलताना केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञाणेश कुमार म्हणाले आसाममध्ये सर्व 125 मतदारसंघात एकच टप्प्यात, केरळमध्ये 140 विधानसभा आणि पद्दुचेरीतील 30 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात 9 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर तामिळनाडूतील 234 विधानसभेसाठी देखील एकाच टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभेसाठी दोन टप्प्यात 152 आणि 142 मतदारसंघात अनुक्रमे 23 आणि 29 एप्रिल ला मतदान होणार आहे. यासर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी लागणार आहेत.
दरम्यान, देशात निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या पाचही राज्यातील विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत आहे. गत 2021 मध्ये या राज्यांमधील निवडणुकांची घोषणा 26 फेब्रूवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी , पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत निवडणुका झाल्या, आसाममध्ये 3 टप्पे तर तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
17.4 कोटी मतदार,25 लाख कर्मचारी : देशाच्या 5 राज्यातील मतदारांची संख्या एकूण 17.4 कोटी एवढी आहे, तर 824 एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण मतदान केंद्रांची संख्या 2.19 लाख एकूण कर्मचारी 25 लाख कार्यरत असल्याची माहितीही आयोगाने दिली.



Comments