पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यावर नांदेडमध्ये प्राणघातक हल्ला ! सुखबीर सिंग बादल यांवर ‘कृपाण’ने वार ; आरोपीस तत्काळ अटक, वकील आरोपीचे पुणे कनेक्शन

नांदेड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हे सहकुटुंब नांदेडमधील येथील मुगूटच्या मातासाब गुरूद्वारामध्ये दर्शन घेवून बाहेर येत असताना त्यांच्यावर गुरूद्वारात ‘ कृपाण’ ने प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील यशोसाई खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नीशी संपर्क करून प्रकृतीची माहिती घेतली.
नांदेड मधील एका गुरूद्वारात शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर धारदार शस्ताने हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला दुपारी 1:45 च्या सुमारास ‘ माता साहिब देवान जी मुगत’ येथे झाला. सुखबीर सिंग बादल येथे कुटुंबासह भेट देण्यासाठी गेले होते. हल्ल्यात बदल यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी तातडीने शहरातील यशोसाई हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बादल यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असलेले पोलीस निरिक्षक संतोष केंद्रेही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. बादल यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव जसपाल सिंग आहे. तो निहंग आहे. विशेष म्हणजे जसपाल सिंग वकील आहे. 62 वर्षीय जसपालसिंग मुळचा पुणे येथील असून पुणे न्यायालयात वकीली करत होता. मागील 2 वर्षापासून नांदेड जवळील मुगट येथील मातासाब गुरूद्वारात तो सेवा करत आहे. आज सुखबीर सिंग बादल मातासाब गुरूद्वारातून दर्शन घेवून बाहेर पडताच त्याने त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर जसपाल सिंग जागेवरूनच अटक करण्यात आली. पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात असून, हल्ल्याचं नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बादल यांच्यावर उपचार करणार्या यशोसाई हॉस्पिटलच्या डॉक्टर म्हणाले की, हल्ल्यात सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, तीन वरिष्ठ सर्जनची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांच्या रक्तदाब वाढलेला आढळल्यामुळे, अॅनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोनिल अधिक्षक निलाभ रोहन, पोलिस महानिरिक्षक आणि सिव्हील7 सर्जन यांच्यासह जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकरी परिस्थितीवर लक्ष ठेण्यासाठी यशोसाई हॉस्पीटलमध्ये तळ ठोकून होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योचे चौकशीचे आदेश: घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलिस अधिक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर आरोपील त्वरीत अटक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना या हल्ल्यामागील हेतूचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर असल्याचंही अधिकार्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंग बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संंवाद साधला आणि हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
उपमुख्यमंत्री एकना शिंदेनी घेतली दखल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी व खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधत विचारपूस केली. या संभाषणादरम्यान, त्यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून ते लवकरात लवकर पूर्णपणे स्वस्थ व्हावेत अशी प्रार्थना केली. तसेच “ या हल्ल्यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीसी घातले जाणार नाही. हल्लेखोरांवर लवकरात लवकर आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” असे ठोस अश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी कौर यांना दिले.
पंतप्रधान मोदींनी साधला संवाद: पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विचारपूस:
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नांदेडच्या पोलिस अधिक्षकांशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. घटनेचा सखोल तपासक करून सुरक्षेतील त्रुटी तपासण्याचे आणि कृत्यामागे असलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव तलवार यांनी ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, सुखबीर सिंग बादल गुरुद्वारात नतमस्तक होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून, त्यांचा बचाव करताना त्यांचा सुरक्षा अधिकारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. तलवार यांनी या हल्ल्याचे वर्णन केवळ बादल यांच्यावरीलच नव्हे, तर पंजाबच्या एकता आणि अखंडतेवरील हल्ला असे केले. बादल हे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री असूनत यांना ‘ झेड प्लस’ सुरक्षा कवच आहे, हे नमूद करत त्यांनी या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्याचे म्हटले.
भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांनीही या हल्ल्याचा निशेध केला आहे. त्यांनी हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आणि लोकशाही समाजात हिंसेला स्थान नाही, लोकशाहीत राजकीय मतदभेद असेण स्वभाविक असले, तरी त्या आधारे हिंसाचाराचे समर्थन कधीच केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आणि लोशाही मूल्ये व कायद्याचे राज्या जपण्याचे अवाहन केले.
बादल यांच्यावर 2004 मध्येही झाला होता हल्ला: डिसेंबर 2004 मध्ये, ‘ ब्बर खालसा इंटरनॅशनल’चा दहशतवादी आणि खलिस्तानी कार्यकर्ता नारायण सिंग चौराह याने सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारावर बादल यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी बादल एका धार्मिक शिक्षेचा भाग म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वारावर ‘ सेवादार’ म्हणून सेवा बाजावत होते. 2004 मधील या गोळीबारात बादल यांना कोणतीही दुखापत झाली नाही.



Comments