top of page

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

Jul 25
1 min read

नवी दिल्ली : धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदार्‍यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे.


प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा यसा मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. तसेच ते इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अध्यक्षदेखील आहेत. आता पुढील काही काळ त्यांच्याकडे शिक्षण खात्याचीही जबाबदारी असणार आहे.


दरम्यान, केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यातील तिसर्‍या फेरीच्या चर्चेच्या काही तास आधी हा राजीनामा देण्यात आला. बैठकीपूर्वी सीजेपी च्या नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा नॉन-नेगोशिएबल असल्याचे स्पष्ट केले होते. आणि हीच आंदोलनाची प्रमुख मागणी बनवली होती. त्यामुळे प्रधान यांना पद सोडावे लागले आहे.

Comments


bottom of page