‘सीजेपी’ म्हणजे काँग्रेस ‘जिताओ’ प्रोग्राम- मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात भाजच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीतून फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाना
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी ‘फेक नरेटिव्ह ’ उभे करून काँग्रेसने वातावरण कलुषित केले. आता पुन्हा एकदा ‘ फेक नरेटिव्ह’ ची फॅक्टरी सुरू झाली असून, खोटे बोल , पण रेटून बोल’ या पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू आहे. या खोट्या प्रचाराला भाजप कार्यकर्त्यांनी समाजाध्यमे आणि युवा शक्तीच्या माध्यमातून आक्रमपणे जशास तसे उत्तर द्यावे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्हाला कजोर समजू नका, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँगेसला दिला.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि.31) पुण्यात पार पडली. या बैठकीच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या ‘ फेक नरेटिव्ह’च्या लढाईतील अस्त्र आणि शस्त्र तेच आहेत, मात्र, विचार करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे, असं सांगत काँग्रेसच्या राजकारणावर सडकून टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदुत्वाच्या विचारधारेवर भाजपला पराभूत करता येत नसल्याने आता ज्यांचे कोणतेही उत्तरदायित्व नाही, अशा संघटनांना पुढे करून सरकारला प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सक्रिय असलेल्या 180 संघटनांकडून आता वातावरणनिर्मिती केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
संविधानाचे नाव घेतले जात असले, तरी संविधानाची मूल्ये पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक,नियंत्रण आणि महालेखापरीक्षक यांसारख्या संविधानिक संस्थाबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा डाव असल्याचे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांना ‘ दिमागी नक्षल’ म्हटले आहे, तेच युवा पिढीला संभ्रमित करीत असल्याचा अरोपही त्यांनी केला. मात्र, राष्ट्रविचाराने प्रेरित तरुणांची संख्या मोठी असून, भाजपने त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘ वंदे मातरम’ हे मातृशक्तीचे प्रतीक आहे. मात्र ‘ त्व हि दुर्गा दशप्रहरणधारिणी ’ ही ओळ सुरू होताच सोनिया गांधी यांनी थयथयाट सुरू केला. अशी टीका फडणवीस यांनी केली. देशाला पितृस्ताक म्हणणार्यांना ‘ वंदे मातरम्’ मधील मातृशक्तीचे प्रतीक खुपते, असा टोला लगावत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाची राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हत्या केल्याचा आरोप केला.
काहीही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2029 च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू करतील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पुण्यात महिलांसाठी अनेक सामाजिक सुधारणा झाल्या, याच पुण्यात येऊन राहुल गांधी महिलांबद्दल खोट बोलून गेले. महिलांचे एवढेच जर कैवारी होता तर मग संसदेत मुस्लिम महिलांना पोटगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय का बदलला असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.
सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम : कॉक्रोच जनता पार्टीवर टीका करताना फडणवीस यांनी सीजेपी चा अर्थ काँग्रेस जिताओ प्रोग्राम असा सांगितला. या उपक्रमात चार-पाच प्रमुख चेहरे पुढे दिसत असले, तरी त्यांच्या आडून ‘भारत जोडो’ यात्रेतील संघटना कार्यरत असल्याचा अरोपही त्यांनी केला.
राममंदिरात दुर्दैवाने घोटाळा झाला असला, तरी तो तब्बल 1800 कोटी रुपयांचा असल्याचे सांगून राम मंदिर लुटून खाल्ल्याचा आरोप केला जात आहे. हिंदुत्वाला विरोध करून मते मिळत नसल्याने असे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचं फडणवीस म्हणाले. आता कुंभमेळा हे विरोधकांचे पुढचे लक्ष्य असल्याचा दावा त्यांनी केला. कुंभमेळ्यातील कामांच्या निविदा 20 ते 30 टक्के कमी दराने आल्या असून, त्यातून शेकडो कोटी रुपयांची बचत झाली आहे. प्रत्येक कामाची चार संस्थांकडून तपासणी केली ता असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजची तरुण पिढी फेसबुकपेक्षा इन्टाग्रामवर अधिक सक्रिय आहे. त्यामुळे संवादाचे माध्यम बदलले असून, भाजपनेही हा बदल स्वीकारला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात 18 ते 26 वयोगटातील सुमारे दोन कोटी युवा असून, त्यापैकी किमान दहा लाख युवक-युवतींना युवा मोर्चाशी सक्रियपणे जोडण्याचे लक्ष्य त्यांनी दिले. ‘ फेक नरेटिव्ह ’ ला उत्तर देण्यासाठी डिजिटल माध्यमांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.



Comments