राहुल गांधी नाशिक दौर्यावर, भाजप महिला आघाडीचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजचे आंदोलन
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

नाशिक: संसदेत सत्ताधारी भाजपने महिला आरक्षण विधेयकावरून राजकारण तापवले. आता हे राजकारण रस्त्यावर देखील पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी नाशिकच्या दौर्यावर आहेत. ही संधी साधत भाजपने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
राहुल गांधी आज नाशिकमध्ये दाखल झाले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा दहा दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्यावकडून शहरात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनालाही पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमिवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनपेक्षितपणे राहुल गांधी यांच्या दौर्याचा निषेध केला. भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यांनी राहुल गांधी यांच्या दौर्याचा विरोध केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला संसदेत विरोध केल. राहुल गांधी हे महिला विरोधी राजकारण करीत आहे. त्यामुळे महिलांवर अन्याय होत असल्याचा अरोप करत भाजपने त्यांचा निषेध केला. भाजपचे नगरसेवक आणि नेत काळे कपडे घालून राहुल गांधी यांचा निषेध करणार होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांनी पांढरे शुभ्र कपडे घालून आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे त्यांचे हे कपडे चर्चेंचा विषय ठरले.
महिला आरक्षण विधेयक गेले काही दिवस देशात भाजप विरुद्ध विरोधी पक्षांमध्ये राजकीय वादाचा विषय ठरले आहे. सत्ताधारी भाजप महिला विरोधकाच्या आडून डिलिमिटेशन बिल आणू पाहत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी भाजपला कडाडून विरोध केला.
महिला विधेयकाला काँग्रेसचा विरोध राजकीय हेतूने असल्याचा भाजपचा आरोप आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने महिला विरोधी भूमिका घेत आहे. या पक्षाचे राजकारण प्रतिगामी असल्याने भाजपने राहुल गांधी यांचा निषेध केला.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दौरा आणि त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन अशी स्थिती होती. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस राजकारणाचा हा अंक चांगलाच रंगला. काळे कपडे घालून भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा चर्चेचा विषय ठरल्या.



Comments