महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑडिओ क्लिप’वॉर भाजपचा विधानपरिषद आमदारचं यामागचा सूत्रधार शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा; संजय राऊतच मास्टरमाईंड भाजपचा पलटवार

जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ बॉम्बचे पडसाद महायुती सरकारमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या ऑडिओ क्लिप बाबत मोठा दावा केला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या कोअर ग्रूपच्या झुम मिटींगची ऑडिओ क्लिप कोणी जरांगे पाटील यांच्याकडे दिली. आडिच वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आत्ताच बाहेर का निघाली असे प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी ही ऑडिओ क्लिप भाजपच्या एका विधानपरिषद आमदाराने जरांगे पाटील यांना दिल्याचा खळबळजन दावा केला . संजय राऊत यांच्या दाव्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड व प्रवक्ते नवनाथबन यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले.
जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेद्वारे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांकडून तपासासाठी एसआयटीचं अश्वासन दिलं असलं तरी यातून काहीच बाहेर येनार नाही. सत्य असताना खोटं दाखवण्याचं काम होणार आहे. ही ऑडिओ क्लिप एआय, फॅब्रिकेटेड असल्याचं सांगण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांनी आडीच वर्षे जूनी ऑडिओ क्लिप आत्ताच कशी बाहेर काढली, जरांगे पाटील यांना ती कोणी दिली हे प्रश्न निर्माण होत असले तरी, ही ऑडिओ क्लिप भाजपच्या एका विधानपरिषदेच्या आमदाराने जरांगे पाटील यांना दिली. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे खूप ‘लाड’ होते ते आता अंगलट आले. ‘ आडिच वर्षानंरत ही क्लिप कशी बाहेर आली कोण ‘लाडात’ आलंय असे खोचक इशारे देत संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे सेनेवर गंभीर आरोप केले. एकूणच संजय राऊत यांचा रोख भाजपचे प्रसाद लाड यांच्याकडे असल्याचं लपून राहिलं नाही.
शिवाय काल शिवसेना (शिंदे) गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत आमदार प्रसाद लाड यांचे जरांगे पाटील यांच्यासोबत जेवनाचे फोटो दाखवत आमचे मित्र प्रसाद लाड आणि जरांगे पाटील यांच्यात खूप मैत्री जुळल्याचं म्हणत एकप्रकारे यामागे आमदार प्रसाद लाड आहेत हे सांगण्याचा खटाटोप केला.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर भाजपचे प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. प्रसाद लाड म्हणाले 500 कोटीच्या ऑडिओ क्लिप मागचे मास्टरमाईंड संजय राऊत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच आम्ही त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या आरोपानंतर लाड यांनी तातडीने पत्रकार परिषदेे घेत खासदार राऊत यांचे सर्व आरोप फेटाळले. प्रसाद लाड म्हणाले, ‘ आमच्यात आणि एकनाथ शिंदे याचया शिवसेनेत कुठलही भांडण होणार नाही. आम्ही त्यांचा सन्मान करू, आम्ही ताकदीने त्यांच्यामागे उभे राहू. जे काय झाले ते चुकीचे होते. म्हणूनच आम्ही म्हणतोय त्या ऑडिओ क्लिपची चौकशी केली पाहिजे. ती ऑडिओ क्लिप कोणी, कशी कोणापर्यंत पोहोचवली, ती मनोज जरांगेपर्यंत कशी गेली. ते शोधुन काढले पाहिजे.
पुढे बोलताना लाड म्हणाले सामनाच्या स्टुडिओमध्ये हे सर्व झाले, त्याची चौकशी झाली पाहिजे. याचा कर्ता, करविता संजय राऊत आहेत, त्याला बोलावलंच पाहिजे. संजय राऊत यांचा मनसुबा कधी पूर्ण होऊ देणारप नाही. फडणवीसांना बदनाम करण्याचा राऊतांचा मनसुबा आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये स्क्रिप्ट तयार करण्यात आल्याचा आरोपही लाड यांनी केला.
संजय राऊत यांना चांगलं माहित आहे की, यापूर्वीही निवृत्त न्यायाधीशामार्फत निष्पक्ष चौकश्या झाल्या आहेत. माजी आयएएस, आयपीएस अधिकारी नेमून चौकशी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा संजय राऊतचा मनसुबा कधी यशस्वी होऊ देणार नाही, असंही प्रसाद लाड म्हणाले.



Comments