झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे, अभिजीत दिपकेंकडून आंदोलकांचे कौतुक
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

छत्रपती संभाजीनगर: सरकारी नोकरीच्या भरती परीक्षामधील कथित गैरप्रकार, पेपर लीक आणि परीक्षेच्या पारदर्शकतेच्या प्रश्नांवरून झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. रांचीमध्ये आयपीएससी आणि आयएसएससी परीक्षांचे उमेदवार आंदोलन करत असून, आज 10 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी विधानसभेवर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून पाण्याण्याच्या फवार्यांचा वापर आणि लाठीचार्ज करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकण्यात आल्या. पोलिसांनी काटेरी तारांचे अडथळे आणि पाण्यसाचे फवारे मारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान झारखंडमधील आंदोलनावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झारखंडच्या विद्यार्थ्यांशी एकजूट .. असं अभितीत दिपके यांनी एक्य पोस्ट करत म्हटलं आहे.
झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, झारखंड लोकसेवा आयोग (जेपीएससी) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (जेएसएससी) यांच्या विविध भरती परीक्षांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. काही परीक्षांमध्ये पेपर लीक, निकालातील अनियमितता आणि प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे सरकारी नोकरीची तयारी करणार्या उमेदवारांमध्ये नाराजी वाढली आहे.
जेएसएससी-सीजीएल परीक्षेतील पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा संताप आधीपासूनच आहे. 2024 मध्ये यसा प्रकरणावर तपास सुरू झाला होता. त्यानंतरही भरती परीक्षांच्या विश्वासर्हतेबाबत प्रश्न कायम राहिल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
जेपीएससी 14 व्या संयुक्त स्पर्धा परीक्षेच्या प्राथमिक निकालावरही उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निकालाची प्रक्रिया, श्रेणीनुसार कट- ऑफ जाहीर न होणे, निकालाच्या कागदपत्रांवरील स्वाक्षर्यांबाबतचे प्रश्न आणि सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ओएमआर शीटसह विविध मुद्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी केवळ परीक्षा रद्द करण्यापूर्ती नाही, तर भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय किंवा स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि भविष्यात परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी आहे.
झारखंडमध्ये सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी मोठ्या संख्येने तरुण वर्षानुवर्षे तयारी करतात. परीक्षा पुढे ढकलणे, प्रक्रिया वादात सापडणे किंवा पेपर लीकच्या आरोपांमुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झाला तर उमेदवारांचे वय, आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील संधी यांवर परिणाम होतो. त्यामुळे हा आंदोलनाचा भावनिक आणि महत्वाचा मुद्दा आहे.
राजधानी रांचीमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीवरुन विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू आहे. 25 जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाने आता मोठं स्वरुप घेतलं आहे. विद्यार्थ्यांनी आज 10 ऑगस्ट रेाजी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. आदेालक विद्यार्थ्यांनी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी. संबंधित परीक्षा रद्दकरून पुन्हा घेणे आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यसाची प्रमुख मागणी आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमिकवर विद्यार्थी आणि झारखंड सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या; मात्र मागण्यांवर पूर्ण तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. सरकारने तीन परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली असली तरी सीबीआय चौकशीसह इतेर मागण्यांवर विद्यार्थ्यांचा आक्षेप कायम आहे. या प्रकरणी जेपीएससी च्या तीन सदस्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
झारखंडमध्ये आजच्या विधानसभेवरील मोर्चा दरम्यान रांचीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विधानभेच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलिस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी आंदोलन शांततेत पार पाडण्याचं अवाहन केलं असून, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यसासाठी बॅरिकेड्स आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी तिरंगा मार्चही काढला होता. त्यामुळे आजचा मोर्चा आणि त्यानंतर सरकारची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण झारखंडचं लक्ष लागलं आहे.



Comments