भाजपने निवडणुक अयोगाच्या मदतीने आसाम आणि बंगालची निवडणुक चोरली - राहुल गांधी

पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा अभेद्य किल्ला नष्ट केला आहे. आसाम आणि पद्दुचेरीतही भाजचे सरकार येत आहे. आसामध्ये भाजपाने तिसर्यांदा विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाने पश्चिम बंगाल येथील गेल्या अनेक वर्षांचे ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सरकार उलथवून लावत बहुमत मिळवले आहे. भाजपाची अनेक वर्षांची या राज्यात शिरकाव करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. पाच राज्यांपैकी आता पश्चिम बंगाल, असाम आणि पद्दुचेरी या तीन राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात आता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या राज्यातील भाजपाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, ‘ आसाम आणि बंगाल ही स्पष्ट उदाहरणे आहेत जेथे निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने निवडणुक चोरली आहे. आम्ही ममताजींशी सहमत आहोत. बंगालमध्ये 100 हून अधिक जागा चोरल्या गेल्या आहेत. हीच कार्यपद्धती आम्ही यापूर्वीही पाहिली गेली आहे, मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, लोकसभा 2024 इत्यादी. अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपाचा विजयाचा समाचार घेतला आहे.
राहुल गांधींनी दुसर्या पोस्टमध्ये तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील विजयाबाबतही लिहिले आहे. या पोस्टमध्ये आपण थरू विजय यांना बोललो आहोत आणि टीव्हीकेच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. हा जनादेश तरुणांच्या वाढत्या आवाजाचे प्रतिबिंब आहे, ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि केले जाणारही नाही. तामिळनाडू आणि पुद्दुच्चेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी मन:पूर्वक अभार मानतो. मी पुन्हा एकदा सांगू इच्छीतो की काँग्रेस पक्ष तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील जनतेचे रक्षण आणि सेवा करणे अविरातपणे सुरूच ठेवेल असे राहुल गांधी पोस्टद्वारे म्हणाले आहेत.



Comments