top of page

एक्झिटपोल भाजपच्या बाजूने, पण ममता बॅनर्जींचा टीएमसी कार्यकर्त्यांना महत्वाचा मॅसेज 200 जागा जिंकण्याचा दावा; शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुक निकालास अवघे काही तास उरले आहेत.पश्चिम बंगालमध्ये विविध एक्झिट पोल्सनी भाजला आघाडी दर्शवली असली तरी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा मोठा दावा केला आहे. “ आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येत आहोत अश्वस्त रहा” अशा शब्दांत ममता दीदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, काल संध्याकाळी ममता बॅनर्जी यांनी राज्यभरातील मतमोजणी पर्यवेक्षक आणि पक्षाच्या प्रमूुख पदाधिकार्‍यांची एक ‘ व्हर्च्युअल मीटिंग’ घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, “ आपण 200 पेक्षा जास्त जागा पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्ते येत आहोत. आश्वस्त रहा, सोपलेली जबाबदारी चोख पार पाडा. अखेरचा मत मोजला जात नाही,तोवर आपापली जागा सोडू नका, ” असे आदेश ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर केंद्रीय अधिकार्‍यांचा समावेश असल्यामुळे ममता बॅनर्जी काहीशा नाराज आहेत. मतमोजणीत कोणतीही गडबड होऊ नये किंवा संशयास्पद हालचाली होऊ नयेत, यासाठीच त्यांनी कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


टीएमसी पक्षाने निकालासाठीची रणनीती आखली असून, यंदा विधानसभा निवडणुक न लढवणारे ज्येष्ठ पदाधिकारी आणि खासदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निरीक्षक म्हणून आजच रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तृणमुलच्या प्रदेश कार्यालयासमोर सध्यसा शांतता दिसत असली तरी, सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपापल्या नियुक्त जिल्ह्यांमध्ये आणि मतदान केंद्रावर सज्ज झाले आहेत. उद्याच्या निकालात ममता बॅनर्जींचा हा 200 जागांचा दावा खरा ठरणार की एक्झिटपोलचे अंदाज खरे ठरणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Comments


bottom of page