top of page

बंडखोर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी सुरू आहे. गद्दारांशी बंद दाराआड चर्चा करून कोणाला संदेश द्यायचा?

मुंबई : देशभरातील विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नावर आंदोलन केले. त्या आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत नाहीत. मात्र, दुसरीकडे साथ सोडून गेलेल्या सहा बंडखोर खासदारांना पीएम मोदी का भेटले? असा सवाल उपस्थित करीत केंद्र सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाची सुनावणी सुरू आहे. या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत आम्ही आशावादी आहोत. चार वर्षानंतर या ठिकाणी निकालाची अपेक्षा आहे. संविधानाप्रमाणे निकाल द्यावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.


मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकाच्या कारभारावर जोरदार टीका केली. सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये संविधानाप्रमाणे निकाल द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. देशातील राजकारणात मतलबी वारे सुरू आहेत, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण होईल असं अत्याचार विद्यार्थ्यांवर झाले आहेत. मात्र, त्यांची भेट घेण्यास पीएम मोदी यांना वेळ नाही उलटपक्षी भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे. असे सांगत ते बंडखोर खासदार मंडळींना भेट देऊन कोणता संदेश देत आहेत, असा सवाल केला.


खासदारांच्या बंडखोरीचा डाग कोणीच पुसू शकत नाही. त्यामुळे या मंडळींना कोणीच पाठीशी घालू नये. या भेटीचे कात्रण सुनावणी सुरू असलेल्या कोर्टकडे सादर करणार असून मोदींनी कोणाला संदेश दिला आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येऊन लढाई लढायला हवी, असं अवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.


मोदी आंदोलकांना, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, पण बंडखोर खासदारांना भेटतात. त्यांना मी तुमच्या पाठिशी आहे, असं सांगत आहेत. बंद दाराआडची चर्चा होती. तर त्यातील वाक्य बाहेर येण्याचं कारण काय. कुणाला संदेश द्यायचा आहे, असा सवाल उद्वव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीने शिंदे टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासाठी तर हे वाक्य नाही ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हा संदेश कुणाला देत आहे? शिंदे पूर्वी अमित शाह यांना भेटायचे. आता मोदींना भेटत आहेत. शाह इथे असताना ते मोदींना भेटतात. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा धमकी वजा संदेश मदींनी कुणाला दिला? शाहांना, कोर्टाला की फडणवीस यांना दिला? असं ठाकरेंनी पत्रकार परिशदेवेळी स्पष्टच विचारले.

Comments


bottom of page