राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांचा फेक नेरेटिव्ह पुर्णपणे उद्धवस्त झाला- मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : ‘ व्होट चोरी’ च्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टिका कले आहे. राहुल गांधी हे ‘ व्होट चोरी’ चा आरोप करत असले, तरी आम्हाला वाटते त्यांचा राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेला आहे, असा खोचक फडणवीसांनी लगावला. राहुल गांधीचा चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखादी चौकशी समिती स्थापन करावी अशी एखादी व्यवस्था करता येईल का अशी मागणीही करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधीवर सडेतोड टिका केली.
निवडणुक अयोगाच्य एसआयआर प्रक्रियेवरून राहुल गांधी आणि काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, तीनही निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी उभा केलेला कथित‘ फेक नेरेटिव्ह’ उद्ध्वस्त झाला आहे. संविधान हातात घेऊन संविधानिक संस्थावर रोज प्रश्न उपस्थित करणे आणि या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करणे, अशी राहुल गांधीची भूमिका आहे. ते जरी भारतीय संविधान दाखवत असले, तरी त्यांना या संविधानात दिलेली लोकशाही मान्य नाही. त्यांना लोकशाहीने दिलेल्या संविधानिक संस्था मान्य नाही. राहुल गांधींना सर्व संविधानिक संस्था बदनाम करून भारतीय संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे असल्याचा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निवडणुक आयोगासारख्या संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेचा विश्वास मिळवता येत नसल्यामुळे व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याची रणनीती आखली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अशा प्रयत्नांमुळे संविधानिक संस्था कमजोर होणार नाहीत. एसआयआरसारच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. सर्व प्रक्रियाव एकमताने झाल्या असून, कॅबिनेट सेक्रेटरीकडे पाठवण्यात आलेले पत्र हे कोणत्याही व्यक्तिगत विषयाशी संबंधित नसून डेप्यूटेशनवरील नियुक्तीशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फॉर्म क्रमांक 6 बाबत सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या स्वरुपातच प्रक्रिया सुरू असल्याचंही फडणवीस म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याऐवजी राजकीय पक्षांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करावे, असेही फडणवीस यांनी म्हटले. बंगालमध्ये ज्या 15 मतदारसंघात एसआयआर मधून सर्वाधिक नाव काढले गेले, तिथे टीएमसी जिंकून आली. अनेक वर्षापासून एसआयआर प्रक्रिया झालेली नव्हती. त्यामुळे मतदार याद्यांचे पुनर्नरीक्षण आवश्यक होते. एसआयआरबद्दल प्रश्न उपस्थित करण्याऐवजी मतदार यादी चे पुन्हा निरिक्षण महत्वाचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.



Comments