top of page

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा कार्यक्रम स्थगित

1 day ago
1 min read

मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी जोरदार मागणी केली आहे. काँग्रेसकडून शुक्रवारी देशभरात त्यांच्याविरोधात आंदेालन केले जाणार आहे. यापार्श्वभूमिवर एक मोठी घडामोड समोर आली आहे. ज्ञानेश कुमार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा दौरा स्थगित केला. तसेच मेरठमधील त्यांचा कार्यक्रमही स्थगित करण्यात आला आहे.


वाराणसी आणि मेरठमधील कार्यक्रम स्थगितीची माहिती समोर आल्यानंतर त्याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. त्यावर केंद्रीय निवडणुक आयोगाकडून खुलासा करण्यात आला आहे. हे कार्यक्रम अचानक स्थगित करण्यात आले नाहीत. कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय काही कारणांमुळे 21 सप्टेंबर रोजीच घेण्यात आला होता. त्याबाबतची माहितीही संबधितांना त्याच दिवशी देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.


मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मेरठमध्ये शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी जाणार होते. तर वाराणसीमध्ये 28 सप्टेंबरला त्यांचा नियोजीत दौरा होता. दोन्ही ठिकाणी निवडणुक साक्षरतेशी संबंधित मुद्यांवर ते युवकांशी संवाद साधारण होते. आयोगाने म्हटले आहे की, कार्यक्रमांच्या तारखांमध्ये असे बदल होत असतात. परिस्थितीनुसार बदल केले जातात. कार्यक्रमांच्या ठिकाणाची उपलब्धता, नैसर्गिक स्थिती, अधिकार्‍यांचे कार्यक्रम अशी विविध कारणे असू शकतात.

हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंडमध्यही असे कार्यक्रम स्थगत झाल्याची उदाहराणेही आयोगाने दिली आहेत. दरम्यान, दोन निवडणुक आयुक्तांनी एसआयआरसयह विविध मुद्यांवर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यवा राजीनाम्याची मागणी केली जात आहे, कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्ञानेश कुमार यांनी 48 तासांत राजीनामा न दिल्यास पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले जाईल असे सीजेपीचे संस्थापक दिपके यांनी म्हटले.


दिपके यांनी विरोधी पक्षांनाही चांगलेच सुनावले आहे.विरोधकांनी फेरफार होत असलेल्या निवडणुकांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. तुमचे आमदार- खासदार, पक्ष फोडले जात असतील तर कोणते अस्तित्व टिकविण्यासाठी तुम्ही निवडणुका लढवत आहात, असा सवालही त्यांनी केला आहे.

Comments


bottom of page