निवडणुक आयोगा विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! , 4 ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त जन मोर्चा; सर्वपक्षीय एकजुटीची हाक

मुंबई : मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे राहुल गांधींनी रान उठवलं, तर कॉक्रोच जनता पार्टीने थेट जंतर-मंतरवर आंदोलनाचा इशारा दिला आहे. मतचोरीचा आरोप करत निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षांकडून रस्त्यावर लढ्याचा इशारा दिला जात आहे. त्यातच आता मनसे आणि शिवसेना ठाकरे बंधूनीं एल्गार पुकारला आहे. येत्या चार तारखेला मुंबईत संयुक्त जन मोर्चाचा इशारा राज ठाकरे यांनी एक्स पोस्टद्वारे दिला आहे.
केंद्रिय निवडणूक अयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. एसआयआरच्या नावाखाली देशभरातील कोट्यावधींची नावे मतदार याद्यांतून गायब करत सत्ताधारी पक्षाला फायदा होईल असं कर्तव्य केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आयोगावर केला आहे. शिवाय, निवडणूक आयोग मतचोरी करून सत्ताधारी भाजपाला फायदा पोहोचवत असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी वारंवार पत्रकारपरीषद्वारे केला. एकीकडे निवडणुक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांकडून संशय व्यक्त होत असतानाच एसआयआर बाबत मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याच्या मागणी करत काँग्रेसने राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यालयासमोर देशव्यापी निदर्शने केली. कॉक्राच जनता पार्टीनेही मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याची मागणी करत 48 तासांचा अल्टीमेट दिला होता. आता ठाकरे बंधूंनीही निवडणुक अयोगाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. एसआयआरवर तीव्र आक्षेप घेत मत चोरीचाव आरोप करत राज ठाकरे यांनी येत्या दि.4 ऑक्टोबर रोजी मुंबईत जन मोर्चाचे इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या वतिने एक्स पोस्टद्वारे हा इशारा दिला आहे.
आपल्या एक्स पोस्टवर राजक ठाकरे व्यक्त झाले की,÷ सस्नेह जय महाराष्ट्र, देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने एसआयआरच्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या 4 ऑक्टोबर ला मुंबईत एक जन मोर्चा काढणार आहे या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा अवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत. अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हाव. बाकी मोर्चाची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेव्हा एसआयआर विरोधातील या जनमोर्च्यात भेटूया! या, देशातील लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचविण्यासाठी एकत्र या!
राज ठाकरे- उद्धव ठाकरे



Comments