भाजपाच्या हातातलं बाहुल देशद्रोही ज्ञानेश कुमार; ईव्हिएम हटावची मागणीही आंदोलनात करावी लागेल, निवडणुक आयोगाच्या कारभाराविरोधात आमदार रोहित पवारांचे पत्राकर परिषदेत पुरव्यासह सादरीकरण

मुंबई : केंद्रीय निवडणूक अयोगाच्या महाराष्ट्रातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थिती करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत पीपीटीद्वारे सादरीकरणातून गंभीर आरोप केले आहेत. लोकसभेला सहा महिन्यात 6.5 लाख मतदार वाढले आणि लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेला केवळ एका महिन्यात 6.5 लाख मतदार वाढविण्यात आले, हे मतदार कुठून आले आणि कसे आले? असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसीा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान अधिक झाले असून या संपूर्ण प्रकाणात ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण राज्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “ आम्ही पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतले होते पण ज्ञानेश कुमार हा स्वत:ला राजा समजतो. आयोग याच्या बापाचे आहे का? आमचे अनेक उमेदवार हे पिपाणीमुळे पडले. आम्ही अनेक वेळा सांगूनही ऐकले नाही. मतदानाची आकडेवारी पाहिली तर एक लॉजिक लावून एक सीक्वेंसमध्ये निवडून आलेल्या आमदारांची आकडेवारी आहे. तर पराभूत उमेदवारांची आकडेवारीही तशीच आहे. आम्ही आधार कार्ड कसे चुकीच्या पद्धतीने आणि फेक तयार केले जाते याची माहिती दिली होती. शिरुर विधानसभा मतदारसंघात दुबार नावाची माहिती आहे. त्यात आम्ही शोध घेतला तर माणसेच मिळाले नाहीत, असा अरोपही रोहित पवार यांनी केला.
राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी चोलिंगम यांच्यावर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले, “ आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटायला गेलो, ते फक्त गोड बोलतात पण प्रत्यक्ष काम काहीही करत नाहीत. आपण पश्चिम बंगालामध्येही पाहिले, तिथेही तशीच परिस्थिती होती. बंगालमध्ये मतदार वगळून भाजप जिंकली, तसेच महाराष्ट्रात 2029 मध्ये करणार आहे. बंगालचे 27 लाख मतदार अडकून ठेवले, त्यांना मतदान करता आले नाही. एसआयआर वापरून तेथील जनता अडकवली, असंही रोहित पवार म्हणाले.
आम्ही पुण्याहस कल्याण डोंबिवलीत भाजप कार्यालयात बीएलओ सह्या आणि शिक्के मारत असल्याचे पुरावे चोकलिंगम साहेबांना दिले आणि कारवाईची मागणी केली, पण झाली का कारवाई नाही झाली. निवडणुक अयोगावर ज्ञानेश कुमार या मित्राचे संविधाीनक संस्थेवर पुनर्वसन केलं आहे कशी होणार, जसं की एमपीएसीवर मित्राचं पुनर्वसन केलं. वाट लागली संविधानीक संस्थेची तशीच एमपीएससीची पण लागणार म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाना साधला.
महाराष्ट्रात 2.6 कोटी नावे वगळली: बिहारमध्ये सुद्धा हाच फॉर्म्यूला वापरला गेला होता. महाराष्ट्रात एकूण 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळण्यात आली आहेत. खडकवासला मतदारासंघात 5,76,505 मतदार होते, एसआयआरमधून 2,77,851 वगळले, पण 2024 ला 3,26,667 एवढे मतदान झाले होते. त्यामुळे येथे बाहेरुन माणसे आणली गेली, त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले आणि आता त्यांची नावे वगळली जात आहेत. आता एसआयआर झाले. आम्हाला म्हटले की, याद्यांचे शुद्धीकरण केले जाईल. परंतु आम्ही जी दुबार नावे मांडली होती ती एसआयआर नंतर पुन्हा आली आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
एसआयआरच्या माध्यमातून महाराष्ट्रातले 30 टक्के मतदार कमी होण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक दावा करत त्यांनी पत्रकार प्राची कुलकर्णी यांचे उदाहरण देत त्या पत्रकार होत्या म्हणून भांडल्या त्यांनी अधिकार्यांना याबाबत विचारले असता आम्हाला वरून दबाव असल्याचे अधिकारी म्हणाले. पत्रकार होत्याव म्हणून त्यांना न्याय मिळाला पण सामान्य नागरिकांचे काय? केंद्रीयमंत्री अमित शाह म्हणतात की एसआयआर म्हणजे मतदारयाद्यांचे शुद्धीकरण आहे, तर महाराष्ट्राचे निवडणुक आयुक्त चोकलिंगम म्हणतात की कशाचीच गॅरंटी आम्ही देऊ शकत नाहीत एवढा विरोधाभास असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या हातचं बाहूल देशद्रोही ज्ञानेश कुमार आहेत. असा अरोप करत पत्रकार परिषदेतच रोहित पवार यांनी भोसले नाव असलेल्या एका इसमाला थेट व्हिडिओ कॉल केला. भोसले या जिवंत व्यक्तीला एसआयआर यादीत मृत दाखविण्यात आल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच चिंचोली (कर्जत- जामखेड) येथील परशुराम लांडघुले या स्थानिक व्यक्तीलाही कायमस्वरूपी स्थलांतरीत दाखवण्यात आल्याचा पुरावा त्यांनी माध्यमांसमोर मांडला. शेवटी लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला ईव्हिएमच्या विरोधातही मोठे आंदोलन उभारावे लागेल, असानिर्धारही रोहित पवार यांनी यावेळी केला.



Comments