सीजीपेचे आशुतोष रांकासह पदाधिकार्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात आसाममध्ये बैठकीपूर्वीच पोलिसांची कारवाई, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

गुवाहटी : मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याची मागणी करत गांधी जयंती दिनी (दि.2 ऑक्टोबर) देशव्यापी आंदोलनाचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीने सरकारला दिला. निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी 48 तासांचा दिलेला अल्टिमेट काल संपला. सीजेपीने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आसाम मध्ये बैठकीसाठी जाणार्या पार्टीच्या सह-संयोजक अशुतोष रांका यांच्यासह पदाधिकार्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
देशाचे मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याची मागणी करत जंतर-मंतर 2 चा नारा देणार्या कॉक्रोच जनता पार्टीने गांधी जयंती दिनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महात्मा गांधी दिनी (दि.2 ऑक्टोबर) मुंबईतून जंतर-मंतर 2 आंदोलनाची सुरूवात केली जाणार आहे. आंदोलनाची तयारी म्हणून सीजेपीकडून देशभरात संवाद बैठका सुरू असतानाच आज रविवारी (दि.27) आसामच्या गुवाहाटीमध्ये आसाम सचिवालयाजवळ आयोजित बैठकीला सीजेपीचे सह-संयोजक अशुतोश रांका यांच्यासह नेते कार्यकर्ते जात होते. या बैठकीसाठी सुमारे 200 ते 300 कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची तयारी सीजेपी ने केली होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बैठक शांततापूर्ण होती आणि तिचा उद्देश असाममधील स्वयंसेकांना एकत्र आणणे होता. बैठक सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी सभास्थळाकडे जाणारा मार्ग आडवला.
नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्या घेऊन गुवाहटी येथील पोलिस केंद्रात नेण्यात आले. सीजेपी नेते अभिजीत दिपके यांच्या माहितीनुसार, अंकित भारद्वाज आणि प्रेम आकाश यांच्यासह अशुतोष रांका अशा संघटघनेच्या अनेक महत्वांच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी असाममधील काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. या बैठकीला पोहोचण्यापासून कार्यकर्त्यांना रोखण्या आले.
या कार्यकर्त्यांना बैठकीच्या ठिकाणी पोहोचण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. डोंगराळ भागात बैठकीसाठी लोक जमा होण्याचा प्रयत्न करत असतनाच पोलिसांनी ही कारवाई केली. आता यावर सीजेपी नक्की काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सीजेपीकडून या मुद्यात मोठे आंदोलन उभारले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील सरकारी शाहेचा मुद्दा उपस्थित करताना सीजेपी दिसत आहे. अभिजित दिपके देखील राज्यातील जिल्हा परिषद शाळेचा मुद्दा लावून धरताना दिसले होते.



Comments