top of page

अंतरवलीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे स्टेज, मंडप हटवले, अंतरवलीतील शेवटचं आंदोलन होतं यापूर्वीच जाहीर केलं, यापूढे आंदोलन परळी, येवला तालुक्यात होऊ शकतं- जरांगे पाटील

7 hours ago
2 min read

जालना : मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवालीसराटी (ता. आंबड) येथील जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप आणि व्यासपीठ अवघ्या काही तासात हटवण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 2023 पासून म्हणजेच तब्बल 3 वर्षे 27 अखंड उभा असलेला हा मंडप ग्रामस्थ आणि सरपंचाच्या निर्णयानंतर काढण्यात आला आहे.

अंतरवाली गावचे सरपंच आणि मनोज जरांगे पाटीलयांची स्थानिक कोअर कमिटी यांच्यात झालेल्या संवादानंतर हा मंडप काडढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये या मंडपावरून कुजबूज सुरू होती. या सर्व घडामोडींवनर आता स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्ट 2023 रोजी उपोषण सुरू केले होते. मागील तीन वर्षात अंतरवाली सराटी मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरले. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे 11 वेळा आंदोलन केले. 29 ऑगस्ट 2026 रोजी अंतरवाली सराटी येथील आंदोलन शेवटचे निर्णायक आंदोल असेल अशी घोषणा केली होती.निर्णायक आणि शेवटचं आंदोलन म्हणत जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली. नियोजीत मार्गावरील पहिल्या मुक्कामी दि. 15 सप्टेंबर रोजी पाटोदा येथे त्यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांच्यावर पाटोदा येथे उपचार करण्यात आले. मागण्यांवर ठाम जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम असतानाच दि. 16 सप्टेंबर रोजी सरकारचे शिष्टमंडळ तोडगा काढण्यात यशस्वी झाले. मागण्यांची अंमलबजावणीसाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ देत जरांगे पाटील यांनी पाटोद्यात आंदोलन स्थगित केले.


अंतरवली येथील आंदोलन शेवटचे निर्णायक असल्याचे जरांगे पाटील यांनी पूर्वीच जाहीर केले होते. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ, मंडप, स्टेज आज हटविण्यात आले. यावर जरांगे पाटील यांनी रुग्णालयात पत्रकार परीषदेत याबात प्रतिक्रया दिली. जरांगे पाटील म्हणाले की,“ या आंदोलनात अंतरवाली येथील शेवटचं आंदोलन असा शब्द वापरला आहे. अंतरवाली येथील व्यासपीठ आणि सर्व साहित्य आता काढले आहे. आता सरकारने केले नाही तर इथून पुढे पाटोदापासून पुढे आंदोलन होईल. ग्रामसभा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. राज्यात कुठेही आंदोलन होऊ शकतं. आंदोलन राज्यात येवला असो किंवा अंतरवाली कुठेही होऊ शकते, असंही जरांगे पाटील म्हणाले.


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले , यावर आधी विरोध झाला आहे. ग्रामसभा घेऊन ठराव देखील झाला आहे. मात्र मी थांबलो नाही. आंदोलन येवला आणि परळी तालुक्यातील कुठल्याही गावात होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होऊ शकते, मी थांबलो नाही, आंदेालन सुरू आहे. यापूढे अंतरवाली येथे आंदोलन होणार नाही. अंतरवाली येथील हे शेवटचे आंदोलन होते. 3 वर्षे ते गाव काढले आहे. तेथील लोकांनी रक्त सांडले आहे. ओबीसी बांधवांनी शेती दिली, त्या सर्व गावकर्‍यांचा मी आभारी आहे. आता पुढे पाटोदापर्यंत आंदोलन गेले आहे. 3 महिन्यात केले नाही तर पुढे मुंबईकडे जाऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.


सरकारने दुष्काळ जाहीर केला यावरही जरांगे पाटील म्हणाले, सरकारने दुष्काळ जाहीर करताना सरसकट जाहीर करायला पाहिजे, अर्धवट करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसू नये. कर्जमाफी, अनुदान पूर्णपणे 100 टक्के करणे गरजेचे आहे. तसे आता सरकारने जाहीर करावे, हेक्टरी 80 ते 90 हजारते 1 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी सरकारने पाणी चार्‍याची देखील व्यवस्था तातडीने करावी, असे त्यांनी म्हटले.

Comments


bottom of page