top of page

गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच मंडळाच्य अध्यक्षाचा मृत्यू; अहिल्यानगरच्या भिंगारमधील घटना, रात्री 9:30 वाजता रुग्णालयाबाहरे तुफान गर्दी

5 hours ago
1 min read

आहिल्यानगर: गणेशोत्सव सुरू असतना देखील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. पुणे, मुंबईसह इतर महानगरात अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळाच्याव अध्यक्षाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्लेश्वर तरुण गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत धक्कादायक आरोप करण्यात येत असून रात्री 9:30 च्या सुमारास रुग्णालयाबाहरे तुफान गर्दी झाली आहे.


अहिल्यानगरच्या भिंगारमधील शुक्लेश्वर गणपती मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीसाठी पोलिसांकडून रात्री 10:00 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी 9:30 च्या सुमारास लाठीचार्ज केल्याचा आरोप आहे. मंडळाचे अध्यक्ष दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूनंतर मात्र, वाघस्कर यांचा मृत्यू नेमका लाठीचार्जमुळे झाला की वैद्यकीय कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रात्री 10:00 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी असताना रात्री सोडनऊच्या सुमारास पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.


या लाठीचार्जमध्ये वाघस्कर यांना दुखापत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, वाघस्कर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. त्यांनतर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.


गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्याची आणि गणेश विसर्जन न करण्याची भूमिका आमदार जगताप आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास अहिल्यानगर शहरातील शुक्रवारपी होणारे गणेश विसर्जनही रोखण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे.


दीपक वाघस्कर यांचा मृत्यू लाठीचार्जमुळेच झाला की अन्य कारणाने, हा प्रश्न सध्या कायम आहे. डॉक्टरांकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. तसेच पोलीस प्रशासनाने घटनेबाबत सविस्तरप अधिकृत माहिती दिलेली नाही. वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीनंतरच दीपक वाघस्करयांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

Comments


bottom of page