top of page

राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, उपाययोजनांसाठी प्रक्रियेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

1 day ago
1 min read

मुंबई : राज्यात अखेरा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने आज मोठा निर्णय जाहीर केला. राज्यातील 265 तालुक्यातमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. ट्रिगर 1 लागू झालेल्या तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे शेतकर्‍याना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि विरोधक स्वागत करत आहेत.


मिळालेल्यवा माहितीनुसार,राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात फडणवीस सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आह. म्हणजे 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे राज्यातील शेतकर्‍याना आर्थिक मतद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


सरकारच्या या निर्णयामुळे चितेत असलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुष्काळी भागांची पाहणी करत शेतकर्‍यांशी सवांद साधला होता. यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या विविध उपाययोजना जाहिर केल्या आहेत. त्यानुसार, जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट(7.5 हॉर्स पॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधरच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलला आणून अधिकाधिक कामे सुरू करणार, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स पुरवले जाणार आहेत.


त्यासोबत, फडणवीस सरकारने या उपायोजनांमध्ये टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही, शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार, जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करणार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरूच ठेवणार, पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश, पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.

Comments


bottom of page