top of page

मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञाणेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक आंदोलनापूर्वीच जंतर-मंतरवर गोंधळ; राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

6 hours ago
2 min read

नवी दिल्ली : मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञाणेश कुमार यांच्यावर मतचोरी, एसआयआरच्या माधयमातून देशातील कोट्यावधी मतदारांचे नावे वगळल्याचा करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञाणेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काल राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदभवन ते निवडणुक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा पोलिसांनी आकाशवाणी समोर रोखले. यावेळी मोर्चात सहभागी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी चकवा देत थेट आकाशवाणी समोर ठिय्या मांडला .


सायंकाळी उशीरा पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून पुन्हा आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा प्रयत्न केला. आंदोलनासाठी खासदार जंतर -मंतरच्या दिशेने बसद्वारे रवाना झाले. मात्र, या बसेस पोलिसांकडून अडवण्यात आल्या. बस अडवल्यामुळे विरोधी पक्षाचे खासदार, कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये वातावरण चांगलंच तापलं.


काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्य निवडणुक आयुक्तांच्या मुद्यावर दुपारी बैठक बोलावली होती. या खासदारांच्या बैठकीनंतर काँग्रसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि इतर विरोधी खासदारांना घेवून बस जंतर-मंतरकडे रवाना झाली. परंतु या बस पोलिसांनी मध्ये आडवल्या. बस अडवल्यामुळं खासदार आक्रमक झाले. यावेळी खासदार, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या या कृत्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधीसह खासदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला.


यावेळी राहुल गांधी आणि पोलिस अधिकार्‍यांत शाब्दीक चकमक झाल्याचीही माहिती आहे. प्रियंका गांधी यांनी इतर महिला खासदारांसमवेत पोलिसांना जाब विचारात रस्त्यावरच ठिय्या मांडला. काही वेळानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना अक्षरश: उचलून पोलिसांच्या गाडीत नेण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदाबस्त तैनात करण्यात आला होता.


दरम्यान,काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणल्या “ केवळ निवडणूक आयुक्तांना भेटू इच्छिणार्‍या खासदारांना ते अशी वागणूक देतात. ते आम्हाला अशी वागणूक देतात. खासदारांना पोलिस मारतात, हे सर्व काय सुरू आहे. आम्हाला फक्त जंतर-मंतरवर आंदोलन करायचं होतं. पण तेही का करू देत नाहीत. पोलिसांनी मला सर्वत्र ओरबाडले आहे. त्यांनी आम्हाला जमिनीवर फेकले. आता आम्ही येथून हलणार नाही. त्यांनी आपलं पोलिस दल मागं घ्यावं. मी येथून हलणार नाही. असं म्हणत प्रियंका गांधीं रस्त्यावर आडव्या झोपल्या.


प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एक पदक-राहुल गांधी: आपल्याविरोधात आधीच 45 एफआयआर दाखल झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच 100 एफआयआर दाखल झाले तरी पर्वा नाही. प्रत्येक एफआयआर आपल्यासाठी एक पदक असल्याचं राहुल गांधी म्हणाले. ‘ आज आम्ही जंतर-मंतरवर आंदेालन करणार आहोत. आम्हाला देशाला सांगायचं आहे की, ज्ञानेश कुमार हे वैध मुख्य निवडणुक आयुक्त नाहीत, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. कॅनॉट प्लेस येथील सागर रत्नामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस खासदार आणि इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले.


राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या विरोधात गुन्हा: ऑल इंडिया रेडिओ’च्या कार्यालयात बळजबरीने प्रवेश केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा , के.सी. वेणुगोपाल, पवन खेरा, मनीष छत्रथ आणि सुमारे 50 ते 60 समर्थकांनी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना आकाशवाणी भवनाच्या आवारात प्रवेश केला आणि तिथं धरणे आंदोलन केलं. सुरक्षा कडे तोडून आणि कलम 163 चे उल्लंघन करून या गटाने आवारात बळजबरीने प्रवेश केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधीयांच्यासह नेत्यांवर गुन्हा दाखल केला.

Comments


bottom of page