राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे . ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून , शिवसेना शिंदे गटाकडून एक, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक अर्ज दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते यांचे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार, शिवसेना शिंदे गटाकडून ज्याती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियास पूर्ण झाली असून या सातही जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यानंतर शरद पवार यांनी सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनेतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपत्रांचा मनापासून ऋणी असल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की. 1967 पासून माझा लोप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदिर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवेलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले.
दरम्यान, 1967 मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जाबाबदार्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदार्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माण्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे. असंही शरद पवार पोस्टद्वारे म्हणाले.



Comments