top of page

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष,युवक प्रदेशाध्यक्षांची निवड चाकणरांचा उत्तराधिकारी निवडला, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा मोठा निर्णय

Aug 6
2 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखील ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.


अशातच, महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड अनेक अर्थाने महत्वाची ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या 26 वर्षाचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद, असे 14 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या पुढची मोठी जबाबदारी समजून काम करायल हवं अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली.


राजकारणाची सुरुवात दिवंगत अजित पवार यांच्यामुळे झाली. आज ते हवे होते, त्यांची कायम उणीव जाणवत राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळाले. त्यामुळे आज जबाबदारी खुप वाढली आहे. दादांची ‘ कामाचा माणुस’ ही ओळख आम्हाला आणखी तळागळात घेऊन जायचं आहे. गेल्या 26 वर्षाचा हा प्रवास आहे. पंचात समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद, असे 14 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आहे. जबाबदारी मोठी समजून काम करायला हवं. अशी प्रतिक्रिया वैशाली नागवडे यांनी दिली. वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष नियिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी प्रदेश कार्यालयात जाऊन अजितदादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतले.


दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबत काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत बोलताना वैशाली नागवडे म्हणाल्या की, ‘ पुणे शहरात आम्ही काल या विरोधात आंदोलन केलं. शिव-शाहू- फुले- आंबेडकर विचारधारा जपणारा महाराष्ट्र आहे. काँग्रेसला सुनेता पवार यांचं दु:ख कळायला हवं, हे अजिबात शोभणारे नाही. किती मोठं दु:ख पचवून त्या कशा प्रकारे पदावर आल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत जबाबदारीने बोलणं गरजेचं होतं. एकीकडे बारामतीमध्ये विधानसभेला मदत केली म्हणायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे टीका करायची हे काँग्रेसला शोभणारे नाही, असेही महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे म्हणाल्या.


आज अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आहे. मोठी जबाबदारी आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असतो. संघटना ही नेत्याचा स्वाभिमान असतो. त्यांतून सूरज चव्हाण यांची घटना घडली होती. पुन: असं काही होणार नाही. अशी प्रतिक्रिया निखिल ठाकरे यांनी दिली.

Comments


bottom of page