राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, भाजपचा काँग्रेसला धक्का; हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

बुलढाणा: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपने राजकीय खेळी करत थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाच धक्का दिला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचे निकटवर्तीय कॉग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना गळाला लावले आहे. बोंद्रे यांनी काँग्रेसची साथ सोडली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची तारीख देखील ठरली असून सपकाळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात काँग्रेसला लागलेली गळती अद्याप थांबण्याचे नांव घेत नाही. आता बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. यामुळे जिल्ह्याहस चिखलीच्या राजकारणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
बोंद्रे यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी, मागील 25 वर्षापेक्षा अधिक काळापासून मी राजकारण, सहकार, शिक्षण, बँकिंग आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याशी नाळ जुळवून आहे. विशेष म्हणजे चिखली मतदारसंघातील नागरिकांसोबत या लोकांच्या संपर्कात राहून सेवा करत आहे. तर मी असो किंवा माझ्या परिवाराने राजकारणाकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिले नाही. याकडे फक्त सेवा करण्याचे माध्यम असे पाहिलं आहे.
पैसा मिळणवण्यासाठी नाही तर इतरांना मदत करून, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन आनंद मिळवायचा हा उद्देश आम्ही सातत्याने ठेवला आहे. या राजकीय प्रवासात मी सातत्याने माझ्या पक्षासोबत प्रामाणिक राहिलो, जनतेसोबत देखील प्रामाणिक राहिलो. हीच माझी संपत्ती आहे. तुम्ही या प्रवासात मला नगराध्यक्ष दोनदा विधानसभेत पाठवलं. माझ्या बोलण्यावर सहकारातल्यवा अनेक निवडणुकीत मतदान केलंत, यामुळे तुमचा विश्वास हाच माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही, माझी जात,धर्म, पक्ष बघितला नाही. या सर्व भिंती तोडून मतदाराने मतदान केलंत, आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रेम दिलं.
पण राजकीय आयुकष्यात अनेकदा निर्णय घेणं फार अवघड असतं. अनेक आठवणी, नाती आणि संबंध असतात, अशोवळी निर्णय घेणं फार अवघड असतं असं म्हणत त्यांनी आता एक अवघड निर्णय घ्यावा लागणार असल्याचे आपल्या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
तसेच हा निर्णय आपल्या स्वार्थासाठी किंवा कोणत्या पदासाठी नाही तर माझ्यावर प्रेम करणार्या त्यासर्वांसाठी आहे तर चिखलीच्या राजकारणाची भविष्य ठरवण्यासाठी तो निर्णय घेत आहे. काहींना याबाबत प्रश्न पडू शकतात. काहींना तो पटेल तर काहींना वेळ लागेल. पण मी इतकंच सांगेन की राहुल बोद्रे मागी 25 वर्षात कधी बदलला नाही, पुढेही बदलणार नाही.
मार्ग बदलले पण माणसं नाही. माझा उद्देश नाही, राजकारणाची दिशा बदलेल पण मार्ग नाही, असे म्हणत ज्या पद्धतीने आतापर्यंत साथ दिली तशीच पुढेही द्या असा साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे. तसेच यावेळी बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच्या आपल्या प्रदिर्घ प्रवासाच्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे. तर आता आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. तर येत्या 22 सप्टेंबर रोजी राहूल बोंद्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.



Comments