top of page

मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या अधिक - उद्धव ठाकरे

11 minutes ago
2 min read

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे प्रश्न ऐनवेळेस टपकलेले नाहीत, अनेक काळापासून ते चालत आलेले आहेत. मराठवाडा लढणारा आहे निजामाबरोबर लढणारा मराठवाडा आहे. लढण्याची पार्श्वभूमि असणारा हा मराठवाडा रडणारा कधी झाला. रजाकाराबरोबर लढताना जो संघर्ष झाला. रक्तरंजीत संघर्ष, तो रक्तपात होता. त्यामध्ये मराठवाड्याने किती आत्माहूती दिली आणि मराठवाडा आपल्या देशात आल्यानंतर गेल्या 75 वर्षात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आकडे काढले तर कदाचीत हुतात्म्यांपेक्षा शेतकरी आत्महत्या जास्त असतील असा आरोप करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीसरकारवर जोरदार हल्ला चढवला.


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी (दि.17 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठकारे) पक्षाच्या वतिने जन आंदोलन ‘ तुम से ना हो पाएगा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते आंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


पुढे बोलताना उद्धव ठकारे म्हणलो, सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठा पुतळा उभारला, पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या दिवशी जिन्ना गेला त्याच दिवशी ऑपरेशन पोलो राबवून निजामाला गुडघ्यावर टेकले आणि मराठवाडा भारतात आणला. पण, तुमची हिंमत आहे का? पाकव्याप्त काश्मिरमध्ये फौजा घुसवण्याची. यांनी पश्चिम बंगालची निवडणूक जिंकायची, भाजपसाठी जिंकायची म्हणून यांनी तिथे फौजा घुसवल्या, देशासाठी फौजा नाही घुसवल्या यांनी. लातुरमध्ये एका शेतकर्‍यांला मुख्यमंत्र्यांनी बैल दिला, त्या बैलाच्या खांद्यावर जू ठेवलं तर तो बैल गपकन बसला. त्याच्या उपचाराचा खर्च शेतकर्‍याच्या डोक्यावर मग हे सरकारच्या मंत्रीमंडळातील बसे बैलं तुम्हाला न्याय देतील? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सरकारवर घणाघाती टिका केली. मुक्तीदिनी हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र वाहिले पण आजही आम्हाला अन्यायापासून मुक्ती पाहिजे.


आजचे पेपर पाहिले तर पहिल्या पानांवर मोठमोठ्या जाहिराती गद्दारांनी दिलेल्या. या सर्व जाहिरांतींचा खर्च एकत्रित करून मराठवाड्याला दिला असता, तर मराठवाड्याचं थोडं तरी कल्याण झालं अशी टिका करत त्यांनी वृत्तपत्रातील बातम्यांचा अधार घेत मराठवाड्याचा अनुशेष 60 हजार कोटींवर गेल्याचा दावा ठाकरे यांनी केला. कालच्या कॅबिनेट बैठकीत चिंत व्यक्त केली म्हणे, चिंता.. शेजारच्य कर्नाटक सरकाने जिथे काँग्रेसच सरकार आहे .त्या सरकारने 27 ऑगस्ट रोजीच दुष्काळ जाहीर करून मदतीला पण लागल. ‘पण आम्ही पंचांग वाले, आम्ही मुहूर्त बघतो बरे’ पंंचांगामध्ये 5 ऑक्टोबरचा मुहूर्त दिलाय म्हणे, अशी मिश्किली टिका करत शेतर्‍यांच्या मरणाची वाट पाताय तुम्ही.? शेतकरी पंचांग बघून आत्महत्या नाही करत तो दु:ख भोगून आत्महत्या करतोय असे खडे बोलही ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले.


खड्ड्यात घाला तुमचे मुूहूर्त 5 आक्टोबर पासून यांचे पंचनामे सुरू होणार. जोपर्यंत यांचे पंचनामे चालू राहतील तापर्यंत कित्तेक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झालेल्या असतील. जबाबदार कोण या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना हे सरकार जबाबदार आहे. माझा जाहीर आरोप आहे की, सरकारची सीबीआय चौकशी करा. निर्घुनपणाने तुम्ही सत्ता भोगताहात तुम्हाला शेतकर्‍यांचं तुम्हाला काही घेणं नाही. आत्ता दुष्काळ आहे आणि आता दुष्काळ जर जाहीर केला तर दुष्काळाच्या सवलती तुम्हाला लागू करव्या लागतीलच. जरांगे पाटील आपलेच आहेत पण आमदार खासदार विकत घेणारे आता पुरस्कारही विकत घेत आहेत. निर्लज्जपणाने ते आपल्यालाच म्हणतील हमारे जैसा तुमसे न हो पायएगा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारसह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली.

Comments


bottom of page