top of page

महिनाभरात राज्यभर मोफत विज, गोव्यात अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

पणजी/ पोंडा: आम आदमी पार्टीने गोव्यातील पोेंडा पोटनिवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजन अरविंद केजरीवाल यांनी पोंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश यांच्या समर्थनार्थ एका ‘परिवर्तन सभे’ ला संबोधित केले. त्यांनी गोव्याच्या जनतेला थेट आवाहन केले, “ 2027 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ ला संधी द्या, आणि आमचे सरकार स्थापन होताच, आम्ही एका महिन्यात संपूर्ण गोव्यात विज मोफत करण्याचे अश्वासन अरविंद केजीरीवाल यांनी यावेळी दिले.


पोेंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या समर्थनार्थ परिवर्तन सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ प्रणीत पंजाब सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत गोव्याच्या विकास कामांचे रोड मॅप मांडले. केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, “ दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’ सरकाने घरगुती वीज बिले शून्यावर आणली आहेत. गोव्यातही तेच होईल. संपूर्ण देशात फक्त दोन ठिकाणी मोफत वीज दिली जाते, दिल्ली आणि पंजाब, आणि तेही ‘आप’ नेच केले आहे”

भाजपवर निशाना : गोव्यात भाजप 14 वर्षापासून सत्तेत आहे, पण लोकांना शिक्षण, आरोग्य, वीज किंवा स्वच्छ पाणी यांपैकी काहीही मिळालेले नाही. फक्त लूटमार झाली आहे. पोंडामध्ये सर्वत्र कचरा पसरलेला आहे, रस्ते तुटलेले आहेत आणि पथदिवे बंद आहेत, पिण्याच्या पाण्यात किड्यांचा प्रदुर्भाव आहे. आयुष्मान अरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद आहेत, आयडी हॉस्पिटलमधील यंत्रे चालत नाहीत, औषधे उपलब्ध नाहीत आणि ते रुणांना सरळ जीएमसीकडे पाठवत असल्याचे गंभीर आरोप करत भाजपवर त्यांनी निशाना साधला.


भाजप नगरसेवकाच्या मुलावर गंभीर आरोप : अरविंद केजरीवाल यांनी एक संवेदनशील मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले की, एका भाजप नगरसेवकाच्या मुलावर 30 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा अरोप आहे, पण संपूर्ण भाजप सरकार त्याला वाचवण्यात व्यस्त आहे. प्रदेशाध्यक्ष मुलाच्या वडिलांबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, पण पीडित मुलांच्या कुटुंबीयांबद्दल कोणतीही सहानुभूती नसल्याचंही केजरीवाल म्हणाले.


यावेळी जनेतेला अवाहन करत केजरीवाल म्हणाले की, “ पोंडाच्या जनतेने यापूर्वी एमजीपी , काँग्रेस आणि भाजपला संधी दिली होती. आता फक्त महिने उरले आहेत. यावेळी आपला एक संधी द्या. जर आम्ही काम करून दाखवले नाही, तर पुढच्या निवडणुकीत आमची जागा घ्या. पण किमान एक प्रयत्न तरी करून बघा.” पोंडा पोटनिवडणुक 9 एप्रिल रोजी आहे. केजरीवाल म्हणाले की, या वेळी आप ला जिंकवून द्या 2027 मध्ये गोव्याची सत्ता सोपवा आणि वजी मोफत मिळवा असे अवाहनही त्यांनी केले.

Comments


bottom of page