भारतात ‘कॉक्रोच’ ट्विटर अकाऊंड सस्पेंड अवघ्या चार दिवसात सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
- Navnath Yewale
- 12 minutes ago
- 1 min read

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणाई झुरळा (कॉक्रोंच) प्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देशात कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये या पार्टीने सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले आहेत. इन्स्टाग्रामवर 10.5 मिलियन आणि ट्विटरवर जवळपास 1,60,000 पर्यंत या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या पोहोचली आहे, मात्र या पार्टीला आता मोठा धक्का बसला आहे. भारतातील ट्विटर अकाऊंट संस्पेंड करण्यात आलं आहे. याबाबत कॉक्रोच जनता पक्षाचे अभिजित दिपके यांनी पोस्अ करत माहिती दिली आहे. अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं भारतामधील ट्विटर अकाऊंट संस्पेंड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या पार्टीला देशभरातील तरुणाईला मोठा प्रतिसाद मिळत आहे.याचाच परिणाम म्हणूनया पार्टीच्या फॉलोवर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्टीची स्थापना भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानानंतर अभिजित दिपके यांनी केली आहे. सध्या ही पार्टी देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी हे या कॉकरोच जनता पार्टीचं घोषवाक्य आहे. दरम्यान अवघ्या पाच दिवसांमध्ये या पक्षाला एवढी प्रसिद्ध मिळाल्यानंतर आता या पार्टीची पुढील वाटचाल नेमकी कशी असणार? असाही अनेकांना प्रश्न पडला आहे. यावर अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजून काही ठरवलं नाही, आमच्या पार्टीचे फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत, आधी सर्वांच्या समस्या जाणून घेणार, प्रश्न समजून घेणार, त्यानंतर पुढची दिशा ठरवू असं अभिजित दिपके यांनी म्हटले आहे.



Comments