top of page

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या दीड तास आधीच, ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या दीड तास आधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुजारी आणि मुएझिन (प्रार्थनेसाठी अजान देणारे) यांच्या मानधनात 500 रुपये ने वाढ केली. आता त्यांना दरमहा 2000 रुपये मिळतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दुपारी एका पोस्टमध्ये लिहिले की, “ समुदायांचे आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन राखण्यात पुजारी आणि मुएझिन महत्वाची भूमिका बाजावतात. सरकारने मानधन योजनेअंतर्गत पुजारी आणि मुएझिनसाठी सर्व नवीन अर्जांना मान्यता दिली आहे.


ममता बॅनर्जी यांनी लिहिले की, प्रत्येक समुदाय आणि परंपरेचे मूल्य आणि बळकटी मिळेल असे वातावरण निर्माण करण्यात आल्हाला अभिमान आहे. आमच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाच्या संरक्षकांना योग्य आदर आणि पाठिंबा मिळेल याची खात्री करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरीकडे बंगालमध्ये आज आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 9 एप्रिल रोजी मतदान 4 मे रोजी निकाल घोषित होणार आहे.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी घोषणा देखील केली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना आणि पेन्शनधारकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत, आरओपीए 2009 अंतर्गत महागाई भत्ता (डिए) थकबाकी देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते, राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक, शैक्षणिक संस्थांसारख्या अनुदानित संस्थांचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना या निर्णयाचा फायदा होईल. त्यांनी सांगितले की आरओपीए 2009 महागाई भत्याचे थकबाकीचे पेमेंट मार्च 2026 पासून सुरू होईल. पेमेंट प्रक्रिया आणि नियमांची रूपरेषा देणार्‍या राज्य वित्त विभागाने सविस्तर अधिसूचना जारी केल्या आहेत.


अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार

पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन सुधारणा (एसआयआर) नंतर 1 मार्च रोजी अंतिम मतदार यांदी प्रकाशित करण्यात आली. मतदारांची संख्या 7.66 कोटींवरून 70,459,284 झाली आहे. याच अर्थ असा की आतापर्यंत एसआयआर मधून 63.66 लाख नावे काढून टाकण्यात आली आहेत. जी एकून मतदारांच्या 8.3 टक्के आहेत. डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीतून 58 लाखांहून अधिक नावे काढून टाकण्यात आली होती. सीईओंनी सांगितले की 60 लाखांहून अधिक मतदारांच्या नावांची पडताळणी अजूनही सुरू आहे. तथापि त्यांना नवीन मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.


या नावांवर निर्णय झाल्यानंतर यादी नंतर बदलली जाऊ शकते.2021 च्या निवडणुकीत 294 जागांपैकी 166 जागांवर विजयाचे अंतर 25000 पेक्षा कमी होते. यापैकी तृणमूल काँग्रेसने 102 जागा जिंकल्या तर भाजपने 64 जागा जिंकल्या.5000पेक्षा कमी मतांनी 36 जागांपैकी भाजपने 22 आणि तृमूल काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. अशा परिस्थितीत, प्रत्येक मत महत्वाचे आहे. तथापि,25000 पेक्षा जास्त फरकाने 111 जागांपैकी टीएमसीने 108 जागा जिंकल्या आणि 50000पेक्षा जास्त फरकाने 43 जागांपैकी टीएमसीने विजय मिळवला.

Comments


bottom of page