आखाती देशातील युध्दाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती कोरोनासारखी एकजूट दाखवावी लागेल; आता पुन्हा सज्ज राहण्याचे अवाहान

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने भारतासमोरही आव्हान उभे केले आहे. प्रामुख्याने इंधन तुटवड्याबाबत भारतकाडून चिंता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सोमवारी लोकसभेत देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या युध्दाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना भारत आव्हानांचा सामना करणसाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेचत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी डिप्लोमसीबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले सुरुवातीपासूनच आपण या संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मी पश्चिम आशियातील नेत्यांशी चर्चा केली आहे. तणाव आणि संघर्ष संपविण्याचा आग्रह मी केला आहे. भारताने नागरिक, ऊर्जा आणि वाहतुकशी संबंधित हल्ल्यांचा विरोध केला आहे.
व्यावसायिक जहाजांवरील हल्ला आणि होर्मुज सामुद्रधुनीसारख्या जलमार्गातील अडथळे अस्वीकार्य आहे. भारत डिल्पोमसीच्या माध्यमातून युध्दाच्याया स्थितीतहि जहाजांच्या वाहतुुकीसाठी प्रयत्न करत आहे. भारत नेहमीच मानवतेच्या हितासाठी आणि शांततेसाठी आवाज उठवत आला आहे. चर्चा आणि कुटनीतीच या समस्येचा मार्ग आहे असंही मोदी म्हणाले.
असे संकट येतात तेव्हा काही तत्व याचे याचा गैरफायदा उचण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कायदा-सुव्यवस्था सुनिश्चित करणार्या सर्व एजन्सी अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. कोस्टर सिक्युरिटी, बॉर्डर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजिक इन्स्टॉलेशन अशी सर्व प्रकारची सुरक्षा वाढविण्यात आल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
युध्दामुळे जगात ती कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा प्रभाव बराच काळ राहण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला त्यासाठी सज्ज राहायला हवे, आपल्याला एकजुट राहायला हवे. आपण कोरोना काळातही एकजुटीने अशा आव्हानांचा सामाना केला आहे. आता पुन्हा आपल्याला त्यापध्दतीने सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. संयम आणि शांत मनाने आपल्याला प्रत्येक आव्हानाचा सामना करायचा आहे. हीच आपली ओळख आहे, ही आपली ताकद आहे.
आपल्याला खूप सावधान आणि सतर्कही राहावे लागणार आहे. यास्थितीचा फायदा उचलणारे खोटं पसरविण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांच्या प्रयत्नांना यशस्वी होऊ द्यायचे नाही. देशातील सर्व राज्य सरकारांनी अशा स्थितीत काळाबाजार करणारे सक्रिय होतात. त्यासाठी कडक नियंत्रण आवश्यक आहे. जिथून अशा तक्रारी येतात, तिथे लगेच कारवाई व्हायला हवी. देशातील प्रत्ये सरकार आणि प्रत्येक नागरिक जेव्हा एकत्रित येईल, तेव्हा आपण प्रेत्येक आव्हानाला आव्हान देऊ शकतो, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.



Comments