जग हारलं: 24 वर्षे सत्ता गाजवणार्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयाने ठोठावली मृत्यूदंडाची शिक्षा
- Navnath Yewale
- 24 hours ago
- 2 min read

सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचे भाऊ माहेर अल-असद आणि चुलत भाऊ आतिक नजीब यांना एका न्यायालयांन थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. देशात सुमारे 14 वर्षे सुरू राहिलेल्या युद्धामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांचा बळी गेला होता. या युद्धजन्य परिस्थितीत केलेल्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं सिसरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सिरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी माजी राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरवले आहे. मात्र, न्यायालयानं ही शिक्षा सुनावताना ते तिथे उपस्थित नव्हते.
सिरियात डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर सत्तांतर घडल्यानंतर 24 वर्षे सिरियावर राज्य गाजवलेल्या बशर अल-असद आणि माहेर यांनी देशातून रशियाची राजधानी मॉस्कोला पलायन केलं होतं.
'
सिरियातील दमास्कसमधील चौथ्या फौजदारी न्यायालयाने मंगळवारी (दि.11 ऑगस्ट) बशर अल-असद यांना पूर्वनियोजीत हत्या, छळ आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. डिसेंबर 2024 मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बशर-अल-असद सध्या रशिया निर्वासित जीवन जगत आहेत. न्यायालयाने त्यांना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली.
त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल-असद, जे सध्या रशियातच असल्याचे सांगितले जाते, यांनाही पूर्वनियाजित हत्या आणि छळाच्या अरोपांमध्ये दोषी ठरवत अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बशर अल-असर यांच्या सरकारमधील परदेशात पळून गेलेल्या अनेक माजी लष्करी आणि सुरक्षा अधिकार्यांनाही अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये अल-असद यांचे संरक्षणमंत्री फहद अल -फ्रीज आणि 2011 मध्ये दारा येथील लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख लआय अल -अली यांचा समावेश आहे.
दक्षिण सिरियातील दारा प्रांताताील राजकीय सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख आतिक नजीब यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. दारा येथे 2011 मध्ये आंदोलन करणार्या नागरिकांवर करण्यात आलेल्या हिंसक कारवाईत राजकीय सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख आजिक नजीब यांची महत्वाची भूमिका होती. या कारवाईनंतरच सिरियातील आंदोलनाला मोठ्या आंदोलनाचं स्वरुनप आले पुढे देशात गृयुद्धाची ठिणगी पडली.
सिरियात सत्तांर घडल्यानंतर सत्तेत आलेल्या नव्यसा सरकारनं बशर अल - असद यसांच्या तत्कालीन सरकारमधील व्यक्तींवर खटले सुरू करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरच हा माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या नातेवाईकाना मोठा धक्का देणारा हा पहिला मोठा निकाल आहे.
दमास्कस येथील न्यायालयाचे न्यायाधीश अल-अरयान यांनी साक्षीदारांच्या जबाबांमधून माजी सिरियन राष्ट्राध्यक्षांची या गुन्ह्यांमधील भूमिका स्पष्ट झाल्याचं म्हटलं आहे. ते या गुन्ह्यांमागील ‘ सर्वोच्च निर्णण घेणारे ” होते आणि गुन्हे घडवून आणण्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा ठपकाही न्यायालयानं बशर अल-असद यांच्यावर ठेवला आहे.
सिरियाकडून रिशयाकडे वारंवार बशर अल - असद यांना तब्यात देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, बशर अल - असद ते रशियाचे दिर्घकाळचे मित्र आणि सहकारी राहिले असून, सध्या त्यांना रशियाने आश्रय दिला आहे.
सिरियाच्या नव्या सरकारशी रशियाचे संबंध वाढत असले तरी, मॉस्कोने आतापर्यंत असद यांना सीरियाच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. रशियाने त्यांना आश्रय दिल्याचे सांगितले जाते आणि ते सध्यसा रयिाच्या राजधानी मॉस्कोमध्ये ऐशोरामाचे जीवन जगत असल्याच्या बातम्या आहेत.



Comments