मुसळधार पावसाने कचर्याचा डोंगर झोपड्यावर कोसळला; 22 जणांचा मृत्यू मृत्यूंचा आकडा वाढण्याची भिती
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

कोनक्रीम: गिनीची राजधानी कोनक्रीममध्ये मुसळधार पावसामुळे झोपड्यावर कचर्याचा डोंगर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दार एस सलाम मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून बचावकार्य सुरू आहे.
गिनीच्या नागरी संरक्षण सेवेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. रवीवारी पहाटे 3:00च्या सुमारास कोनोक्रीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे हे भुस्खलन झाले. ज्यामुळे कचराभूमी ओसंडून वाहू लागली आणि कचराभूमीच्या आजूबाजूच्या झोपड्या गाडल्या गेल्या. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कचराभूमीजवळ राहणार्या स्थानिक रहिवाशांना परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी आपली घरे सोडून इतरत्र पलायन केले होते. मात्र, काही लोक अद्यापही तिथे राहत होते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळत आहे. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. पहाटे 3:00 वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पवावसाचे पाणी कचर्याच्या ढिगार्यावर गेल्याने भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे जवळच्या झोपड्या ढिगारा आणि चिखलाखाली गाडल्या गेल्या.
मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कचर्यांच्या ढिगार्याखाली मोठ्या प्रमाणात पाणी गेले होते. यानंतर कचर्याचा डोंगर खाली कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, कचराभूमीजवळ राहणार्या स्थानिक लोकांना प्रशासनाने सूचना दिल्या होत्या. तसेच हा परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर काही नागरिकांनी आपल्या झोपडपट्या खाली देखील केल्या होत्या. अनेकांनी सुरक्षीतस्थळी स्थलांतर केले होते. त्यांनी धोक्याची ठिकाणं असलेली आपली घरे सोडून दुसर्या ठिकाणी गेले होते. मात्र, काही जणांना झोपडपट्या रिकाम्या केल्या नाहीत. धोका आहे हे माहित असूनही अनेकजण तिथेच राहत होते. अशातच आज दुर्दैवी घटना घडली आहे. कचर्याचा डोंगर कोसळल्यामुळं 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हा भिषण अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी अजूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.



Comments