top of page

झेडपी शाळेत शिकणार्‍या लेकीची 14 व्या वर्षी अंतराळ भरारी!

Aug 12
1 min read

आंध्रप्रदेशामधील धवलेश्वरम येथील ‘ झेडपी गर्ल्ल हायस्कूल’ मधील दहावीचे विद्यार्थी मे 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षाची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहत होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थीनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय ‘ कंडुलाव जेसी’ ची देशीर चर्चा होतेय, जिची ‘ शक्तीसॅट’ या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय केवळ मुलींचा सहभाग असलेली चांद्र मोहिम आहे.


108 देशांमधील सुमारे 12,000 अर्जदारांमधून निवडल्या गेलेल्या 20 भारतीय विद्यार्थ्यांपैकी कंडुला जेसी ही एक आहे आणि या टीममध्ये आंध्र प्रदेशातून सहभागी झालेली ती एकमेव विद्यार्थीनी आहे. या मोहिमेअंतर्गत, विद्यार्थ्यांनी विकसित केलेला ल्युनर क्यूबसॅट 11 ऑक्टोबर रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला जाणार आहे. ही जगातील अशी पहिलीच मोहीम आहे जिथे केवळ विद्यार्थीनी एकत्र येऊन चंद्र मोहिमेसाठी क्यूबसॅट तयार करत आहेत. मोहिमेचा एक भाग म्हणून, जेसीला सॅटेलाइट सिस्टिम (उपग्रह प्रणाली) अंतराळ तंत्रज्ञान आणि इतर तांत्रिक विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कामगिरिमुळे केवळ तिच्या कुटुंबाचा आणि शाळेचाच गौरव झाला नाही, तर सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही एक नवी अयशा निर्माण झाली आहे.


दरम्यान, आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील धवलेश्वरम येथील रहीवाशी असलेल्या 14 वर्षीय कंटुला जेसीची ही कथा एका छोट्या गावातून अंतराळ विज्ञानाच्या भव्य मंचापर्यंत पोहोचण्याची आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या जेसीचे वडील सुतारकाम करतात. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे, तिच्या पालकांनी तिला खासगी शाळेतून सरकारी शाळेत हलवले. सध्या जेसी धवलेश्वरम येथील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थीनी आहे.

Comments


bottom of page