खोदकाम करताना एकच कबरीमधून निघाले 582 सांगडे; दुधाच्या बाटल्या, खेळणी, दप्तर, बांगड्याही सापडल्या
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read

कोलंबो: एका सामूहिक दफनभूमीच्या खोदकामाच्या दरम्यान 582 मानवी सांगडे सापडले आहेत. त्यात बाळांच्या आणि लहान मुलांच्याही सापळ्यांचा समावेश आहे. श्रीलंकेतील जाफनाच्या जवळ असलेल्या चेम्मानी येथील सामूहिक दफनभूमीत सध्या खोदकाम सुरू आहे. दफॅनभूमीत सापडलेले मानवी अवशेष गृहयुद्धाच्या काळात बेपत्ता झालेल्या लोकांचे असण्याची दाट शक्यता आहे.
खोदकाम सुरू असताना मानवी सापळ्यांसह खेळणी, दुधाच्या बाटल्या, शाळेच्या बॅग, बूट, चपला आणि बांगड्या अशा वस्तूही सापडल्या. एका सापळ्याचे दोन्ही हात छातीच्या जवळ बांधलेले होते. चेम्मानीमध्ये सामूहिक दफभूमी असल्याची शंका 1998 पासूनच होती. त्यावेळी एका श्रीलंकन सैनिकावर एका शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा खटला सुरू होता. या सैनिकाला अटक करण्यात आली होती. लष्कराच्या ताब्यात असलेल्या 300 ते 400 तमिळींना संपवून त्यांचा चेम्मानीमध्ये दफन करण्याच असल्याचा अदावा या सैनिकानं चौकशीत केला होता.
यानंतर 1999 मध्ये खोदकामाचे आदेश देण्यात आले. तेव्हा 15 अवशेष सापडले होते. यातील 10 अवशेषांवर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या. पण यानंतर तपास थांबवण्यात आला. चेम्मानीमध्ये गेल्या वर्शी जवळपास 240 मानवी सांगडे सापडले होते. हिंदू स्मशानभूमिच्या जवळ मानवी अवशेष साडल्यानंत खोदकामाला वेग देण्यात आला. सामूहिक दफनभूमिख्शस जवळ मानवी अवशेष साडल्यानं खोदकामाला वेग देण्यात आला. सामूहिक दफनभूमीच्या खोदकामासाठी श्रीलंका सरकारने 62 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
श्रीलंकेत गृयुद्धाची सुरुवात 1983 मध्ये झाली. सरकार आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम (लिट्टे) यांच्यात संघर्ष पेटला. लिट्टे नं वेगळ्या तमिळ राज्याची मागणी केली. यावरून हिंसाचार सुरू झाला. जवळपास 26 वर्षे संघर्ष चालला. त्यात 1 लाखांहून अधिक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या सैन्यानं लिट्टे चा पराभव केला आणि युद्ध संपलं या कालावधीत मोठ्या संख्येनं लोक बेपत्ता झाले. यात तमिळ समुदायातील लोकांचा आकडा मोठा होता.
श्रीलंकेच्या सुरक्षा दलांवर तमिळ नागरिकांनी हत्या, अपहरण आणि अन्य गंभीर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप होत राहिले आहेत. लिट्टे वरही हत्या, अपहरण, अत्याचाराचे आरोप झाले आहेत. जाफनामधील चेम्मानीचा मोठा भाग 1995 पासून युद्ध संपेपर्यंत श्रीलंकेच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली होता. प्रदिर्घ कालावधीपासून सुरू असलेला तपास आणि खोदकामात झालेल्या विलंबानंतर इथे सापडलेले मानवी सांगाड्यांनी श्रीलंकेत गृहयुद्धादरम्यान घडलेल्या घटनांबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.



Comments