महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव- राहुल गांधी पुण्यात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातुन विद्यार्थीनींसी संवाद
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

पुणे: पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधींनी तरुणींशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी महिलांच्या समस्या तर जाणूनच धेतल्या शिवाय भारतात महिलांची काय स्थिती आहे याबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. पण महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
मनुस्मृती हे महिलांना तीन चौकटीत ठेवतात. एक तर मुलगी, बायको आणि आई म्हणून बघितलं जातं, यात काही चुकीचं नाही. पण हीच फक्त तिची ओळख होऊ शकत नाही. 70 कोटी महिला सर्वाधिक महत्वाच्या आहेत. या देशातील मुली स्वतंत्र असेण महत्वाचे आहे. भारतात महिलांसोबत तीन प्रकारच्या हिंसा होतात. जन्मापूर्वीच 4.50लाख मुलींची हत्या, ही पहिली हिंसा आहे. दुसरी हिंसा म्हणजे भारतात 100 पैकी 6 महिलांवर बलात्कार होते. तर तिसरी हिंसाही करिअरमध्ये आणि घरात होते.
राहुल गांधींनी एका महिलेला कौटुंबिक वाट्याबद्दल प्रश्न विचारला. ते म्हणाले की, जर भावाने वाटा मागितला तर त्याला हक्क म्हणतात, पण जर महिलेन तोच वाटा मागितला तर त्याला वाटा म्हणतात. त्यावर त्या महिलेने उत्तर दिले की, कुटुंबे अनेकदा महिलांकडून सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत काम करण्याची अपेक्षा करतात, त्यानंतर त्या धरी पतर येऊन घरकाम, स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेतात. महाराष्ट्र सार्वजनिक ठिकाणी मुलींना होणार्या त्रासाबद्दल मुलींनी राहुल गांधीसमोर पाढा वाचला. मुलींनी त्यांच्या आयुकष्यातील धक्कादायक अनुीव राहुल गांधींसमोर मांडल्यात. बसमध्ये पुरुषावंच्या बाजूला बसायला भीती वाटते आणि तिच बस रिकामी असली तरीही भीती वाटते, असं एका तरुणीने सुरक्षेबद्दलचं भयाण वास्तव मांडलं.
पालघरमधील एका तरुणीने तिच्या आयुष्यात झालेल्या भयान वास्तव सांगितलं. ती म्हणाली की, आमच्यामध्ये मुलांशी बोलण्याची भीती वाटते. मी जेव्हा 8 व्या वर्गामध्ये होते. माझ्या गावामध्ये शाळेतून घरी जात असताना 3 मुलं ही दारू प्यायलेली होती. सगळे विवाहित होते, ते आमच्या गावाशेजारीच राहणारे होते. त्यांनी आम्हाला घेरलं आणि छेड काढली. कमरेला हात लावणे, जवळ येणे, कमेंट करत होते. हा प्रकार पाहून आम्ही घाबरुन पळून गेलो, घरी गेल्यावर मी वडिलांना सांगितलं. वडिलांनी मला आईला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं. आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तिघांना बेदम मारहाण केली.
त्यानंतर माझ्या घरातील आणि गावातील लोक माझ्या विरोधात उभे राहिले. त्यांनी आता मुलीला शिकवू नका, असा सल्ला दिला. तिला घरात ठेवा आपल्या घराची इज्जत गेली आहे, असं लोक सांगत होतं. पण, माझ्या वडिलांनी मला शिकवलं, पुण्यात पाठवलं. मी पुण्यात 2020 मध्ये आली होती. त्यावेळी पीएमपीएमएल बसमधून जात होती. त्यावेळी एका तरुणाने माझ्या कंबरेला हात लावला आणि बसमध्ये खेचलं. मी इतकी घाबरली पण हिंमत करून त्या मुलाच्या मानाखाली वाजवलं. पण एक मुलगीही बोलली नाही.
मागील आठवड्यात मी वसई मधून पुण्यात आली. पुणे स्टेशनवर एक दारुडा माणुस आला आणि त्याने माझ्या ब्रेस्टला हात लावला. तिथेही मुली होत्या. पण कुणीच बोललं नाही. महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की, एका मुलीची छेड काढली तर कुणी बोलत नाही. तमाशा पाहत असतात. त्यामुळे मला सांगायचं अशा परिस्थितीत मुलीला मदत करा,तिची कोणी छड काढणार नाही.यासाठी पुढे आलं पाहिजे.



Comments