top of page

खवड्या डोंगर दुर्दैवी घटनेतील कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडिओ, संगिता चांदगुडे युट्यूबर; आदल्या रात्रीचा व्हिडिओने खळबळ

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या खड्या डोंगरावरील त्रिकोणी कुटुंबांच्या दुर्दैवी अंताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. जागोजागी लोक आपल्या पाल्याला मोबाईल आणि आयफोनवरून समजावून सांगताना दिसत आहेत. या घटनेने जणू भारतीय सामुहिक मनाला धसका बसला आहे. सर्व मोबाईलचा अपरिहार्यपणे सुरू झालेला वापर अराणि घराघरात त्यावरून पालक आणि टिनेजर मुलांमध्ये होणारे वाद आणि नेमकी अशी हादरा देणारी घटना घडल्याने सर्वजण विचारात सापडले आहेत. आता कुणाला चांदगुडे याच्या आईच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.


कुणाल आयफोनमुळे खवड्या डोंगरावरून स्वत: ला झोकून देण्यासाठी गेला होता. त्यावेळी तीन तास तेथे त्यांची समजूत आई- वडिल आणि गावचे सरपंच घालत होते. मात्र, तो काही बधला नाही. त्यानंतर वडील जवळ गेले आणि घात झाला. त्याचा तोल जाऊन दोघेही कड्यावरून थेट खाली कोसळले. त्यानंतर आईने स्वत: खवड्या डोंगरावरून स्वत:ला झोकून दिले. या ह्रदयद्रावक घटनेनंतर आता कुणाल याची आई संगिता चांदवडे यासंच्याबाबत माहिती उघडकीस आली आहे. संगिता चांदवडे या युट्यूबर होत्या आणि आपल्या युट्यूब चॅनलेलवर आपल्या मनातील भावनाही व्यक्त करत होत्या.


विशेष म्हणजे घटनेच्या आदल्या रात्रीच संगिता चांदगुडे यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये प्रेमाची आणि भावनांची किंमत न करणार्‍या व्यक्तिंविषयी भाष्य केलं होतं. त्यात त्या म्हणतात की प्रेम आणि आपुलकी दोन्ही बाजूंनी असायला हवी. पोळी जशी दोन्ही बाजूंनी शिजली की चांगली लागते असं उदाहरण त्यांनी दिले होते. “ जिथे आपल्या प्रेमाची किंमत नाही, अशा नात्याला अर्थ नाही.” असही त्या म्हणाल्या आहेत. ज्या नात्यात दोन्ही बाजूंनी प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, तेच नांत टिकवावं... अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणं चांगलं, अशी भावना त्यांनी या व्हिडिओमधून व्यक्त केल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, घटनेच्या काही तास आगोदर केलेला हा व्हिडिओ चर्चेत आहे. मात्र या व्हिडिओचा या दुर्दैवी घटनेशी थेट संबंध होता, असा कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. याव व्हिडिओ मागची नेमकी पार्श्वभूमि आणि घटनेशी त्याचा काही संबंध होता का, हे तपासूनच स्पष्ट होणार आहे.

Comments


bottom of page