top of page

टोरेंट पॉवर जलविद्युत प्रकल्प पर्यावरणपूरकच; विरोधकांचे फेक नेरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्र विरोधी धोरण - मुख्यमंत्री

1 hour ago
2 min read

मुंबई: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा सावठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावार वृक्षतोड होत असल्याचा अरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर निशाना साधला आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत ‘ कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा संपूर्णपणे पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प असून विरोधकांकडून केवळ फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरू आहे’ असल्याचा पलटवार केला आहे.


रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नियोजीत पंप स्टोरेज प्रकल्पासाठी जंगलातील वृक्षतोडीवर विरोधकांसह पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, विकासाच्या नावाखाली लाखो वृक्षांची कत्तल परवडणारी नसल्याने तात्काळ वृक्षतोड थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे, तर विरोधकांकडूनही सरकारवर निशाना साधला जात आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत विरोधकांचे मुद्दे खोडून काढले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खोटा नेरेटिव्ह तयार करणे म्हणजे महाराष्ट्रविरोधी कृत्य आहे. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीवीका नष्ट होणार नाही आणि जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल. हा संपूर्ण प्रकल्प कायद्याच्यसा चौकटीत राहूनच पूर्ण केला जाईल. असे अश्वासनही त्यांनी दिले.


पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थापोटी या विकासात्मक प्रकल्पाला विरोध केला जात असेल, तर ते अत्यंत अयोग्य आहे.” असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले


प्रकल्पाबाबात सरकारचा खुलासा : हा गुजरातचा प्रकल्प नसून महाराष्ट्राचा आहे, यातील गुंतवणूक, रोजगार आणि निर्माण होणारी वीज सर्वकाही महाराष्ट्राला मिळणार आहे.

या प्रकल्पातून तब्बल 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून महाराष्ट्राला 12,000 मेगावॅट स्वच्छ वीज उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प कोळशावर आधारित नसून सौर उर्जेवर आधारित आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नसून हा प्रकल्प पर्यावरणाला पूरक ठरणार आहे.


प्रकल्पासाठी 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने कंपनीने आधीच वन विभागाला 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. तसेच या क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 आणि वन विभाग 30,000 अशी एकून 90,000 नवी झाले लावणार आहे. मुळात हा प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून 16 किलोमिटर आणि ज्यातिर्लिंग मंदिरापासून 20 किलोमिटर दूर आहे. हा सर्व भाग इको-सेन्सिटिव्ह झोनच्यसा बाहेर आहे.


या प्रकल्पामुळे वर्षाला 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन आणि 40 लाख वाहनांच्या कार्बन उत्सर्जनाइतके प्रदूषण टळणार आहे. तसेच दरवर्षी 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटरची बचत होणार आहे. जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे असते.

Comments


bottom of page