top of page

इंडिया आघाडीचा मोठा निर्णय ; मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञाणेशकुमार विरोधात निर्णायक लढाई 30 ऑक्टोबरला सार्वजनिक महाभियोग, 1 नोव्हेंबरला दिल्लीतील रामलिला मैदानात महामोर्चा, महारॅली

1 hour ago
1 min read


नवी दिल्ली : देशात एसआयआरच्या माध्यमातून ‘ मत चोरी’ चा गंभीर आरोप करत विरोधी पक्ष, इंडिया आघाडी ने केंद्र सरकार आणि निवडणुक आयोगाच्या विरोधात निर्णायक आंदोलनाचा इशारा दिला आहे. विरोधी पक्षाच्या समविचारी पक्षाचे नेते (दि.30) आक्टोबर ला नवी दिल्लीतील हॉटेल अशोक मध्ये ‘ मॉक पार्लियामेंट’ (प्रतिकात्मक संसद) चे आयोजन करणार आहेत. ज्यामध्ये मुख्य निवडणुक आयुक्त (सीईसी) ज्ञाणेशकुमार यांच्या विरोधात ‘ सार्वजनिक महाभियोग’ चालवला जाणार असून जनतेचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.


त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि.1) नोव्हेंबर रोजी रामलीला मैदान पर्यंत एक ऐतिहासिक ‘ दिल्ली चलो मार्च ’ काढला जाणार आहे. यामध्ये 10 लाख नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ एक्स’ पोस्टद्वारे या रननितीची माहिती दिली. संविधानाचे रक्षण आणि मत चोरांना हरवण्यासाठी इंडिया आघाडीने एकजुटीने आंदोलनाची हाक दिली आहे. 30 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक महाभियोग च्या माध्यमातून मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याचा जनतेचा निर्णय स्पष्ट केला जाणार आहे. या नंतर (दि.1) नोव्हेंबर रोजी आयोजित महारॅली देशभरातील नागरिकांना लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रीत आणणार आहे.


या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांना व्यक्तिगत संपर्क करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस मुख्यालयामध्ये पक्षांच्या केंद्रीय कोअरकमीटी, दिल्ली काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसमवेत तयारीच्या संदर्भात मॅराथॉन बैठका सुरू आहेत.


महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा म्हणाल्या की, सना-सुदीचा काळ असला तरी हे आंदोलन स्थगित करण्याचा प्रश्नच उरत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आरोप आहे की, मतदार याद्या पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतून लाखो पात्र मतदारांचे नाव मतदान यादीतून हटवण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टपर्यंत पाहोचलेल्या या प्रकरणाबाबत विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरुन निवाडणुक आयोगावर दबाव आणखी तीव्र करणार आहे.

Comments


bottom of page