बीडमध्ये मराठा सेवक आक्रमक: अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करून हद्दपार करा
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 1 min read

मराठा नेते, मनोज जरांगे यांच्यावर आक्षेपार्ह टीका: शिवाजीनगर पोलिस ठाण्यात औपचारीक निवेदन
बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले यांच्या न्यायासाठी बीडमध्ये गुरूवारी (दि.2÷1) जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चास संबोधित करताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा नेत्यांसह मनोज जरांगे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करत माराठा ओबीसीमध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य केल्याचा अरोप मराठा सेवकांनी केला आहे. मराठा नेत्यांवर अश्लाघ्य भाषेत टीका करून दोन समाजात तेड निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करणार्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कठोर कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्राबाहेर तडीपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्व. विलास घुले यांच्या मारेकर्यांना अटक होऊन त्यांना कठोर शासन झाले पाहिजे ही मराठा सेवक म्हणून आमचीही मागणी आहे. विलास घुले यांना मिळण्यासाठी अयोजित विराट मोर्चास आमचाही पाठिंबा आहे, मात्र गुणरत्न सदावर्ते सारखे लोक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वक मराठा समाजाला लक्ष करून समाजच्या नेत्यांसह मनोज जरांगे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करत आहेत. मोर्चास संबोधित करताना सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. शेरो-शायरी करत मराठा ओबीसीमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप मराठा सेवकांनी केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कठोर कलमाखाली गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणीही मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांच्यासह मराठा सेवकांनी केली. गंगाधर काळकुटे यांनी शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देत मागण्यांचे निवेदन दिले.



Comments