अभिजीत दिपकेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल; लातूरमधील शाळांचे वास्तव मांडल्याने सरकारी कामात अडथळा ?
- Navnath Yewale
- 51 minutes ago
- 1 min read

लातूर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशभरात, ‘ स्कुल ठिक करा’ अभियान सुरू केले आहे. नुकत्याच लातूर जिल्हा दॉर्यात अभिजीत दिकपे यांनी शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणार्या सुविधांच्या अभावांचा भांडाफोड केला. काही शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने इतर शाळेचे विद्यार्थी आणून बसवल्याचा धक्कादायक प्रमार समोर आला होता. शाळेत निकृष्ट अन्न हे विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचेही समोर आले. यावरून अभिजीत दिपके यांनी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, आता अभिजीत दिपके यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शाळेची पाहणी करण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता अणि औसा येथील शिक्षकांना धमकावून सरकारी कामाज अडथळा निर्माण केल्यामुळे अभिजीत दिपके यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाळेचे खरे वास्तव समोर आणले हा जर गुन्हा असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही आमच्या आंगावर घ्यायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया सीजेपीचे कार्यकर्ते अजिंक्य शिंदे म्हणाले.
अभिजीत दिपके यांनी केलेल्या दौर्यामध्ये अनेक शाळांचे भीषण वास्तव समोर आणल्याने शिक्षणविभागाचा मोठा भोंगळ कारीार समोर आला आहे. मध्यान्हामध्ये विद्यार्थ्यांना जो पोषण आहार दिला जातो त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे अढळून आले. तसेच किचनमध्ये देखील अस्वच्छता दिसून आली. तसेच आंबेगावच्या कएा शिक्षिकेने देखील एक व्हिडिओ बनवत शाळेत विद्यार्थ्यांचे काय हाला सुरू आहेत हे दाखवले. मात्र प्रशासनाकडून त्यांनाच बडतर्फ करण्यात आले. माध्यमांनी हा विषय लावूनधरला आणि त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. अशातच आता अभिजीत दिकपे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अभिजीत दिकपे यावर काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.



Comments