top of page

विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी मतदानप्रक्रिया संपन्न, 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत बंद धाकधुक वाढली 27 ऑक्टोबरला निकाल; महायुती, महाविकास आघाडीसह अपक्षांचाही निवडणुकीत सहभाग

2 hours ago
1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. शिक्षक आणि पदविधन मतदारसंघातील या निवडणुकीत एकूण 182 उमेदवार रिंगणात होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्षांनीही निवडणूकीत सहभाग घेत्याने बहुतांश मतदार संघात चुरशीची लढत पाहावयास मिळाली.

दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांना काही ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागल्याने निवडणुकीतील स्पर्धा अधिक लक्षवेधी ठरली. आता मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने लागतो याची उत्सुकता आहे. या पाचही जागांची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यानंतर उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होईल, या निकालांचा राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.


राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली, यामध्ये दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश होता. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या तीन पदविधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये 5 जागांसाठी 182 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्व मतदारांचे भवितव्य 10 लाख मतदारांच्या हातामधये आहे. शिक्षक आणि पदविधर मतदारसंघासाठी अनेक ठिकाणी बंडखोरांनी आणि अपक्षांनी मोठे आव्हान उभे केले आहे. नागपूर पदविधन मतदारसंघासाठी 6 जिल्ह्यांमध्ये 445 मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. पुणे पदविधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 232 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. संभाजीनगर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात 842 मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. अमरावती शिक्षक मतदासंघासाठी तब्बल 81 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.


शिक्षक आणि पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदनासाठी 11 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात आले. मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 10 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात आले असून या पैकी कोणताही एक पुरवा दाखवून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Comments


bottom of page