शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम, जरांगे पाटीलात संघर्षाचा भडका! रामदास कदम क्रॅक जॅक संघटना जरांगे पाटलांचा पलटवार, कप सिरप ची बाटली, फोटो दाखवत रामदास कदमांचा जरांगेना इशारा

जालना: मनोज जरांगे पाटील यांनी काल 32 मिनिटाची ऑडिओ क्लिप ऐकवून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंनी जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा या क्लिपमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे राज्यातली भाजप आणि शिवसेना शिंदे गटात खळबळ उडाली आहे. शिंदे गटासह भाजपनेही या क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या क्लिपची चौकशी करण्याचं अश्वासन शिंदे गटाच्या शिष्ठमंडळाला दिलं. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेतून जरांगे पाटलांवर पलटवार करत इशारा दिला.
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज शुक्रवारी (दि.23) पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांना कप सिरपचा फोटो दाखवत ‘ही कशाची बाटली आहे, ओळखता का? हा व्यक्ती तुम्हाला काय देतोय, आमचे मित्र प्रसाद लाड तुमच्या सोबत जेवत आहेत, तुमचं खुपच मित्रत्व आहे. असं फोटो दाखवत इशारा दिला. मी पुराव्या शिवाय बोलत नसतो. जरांगे काय पत्रकार परिषदा घेता काय बोलता, शिंदे साहेबांना संपवयला निघालात, स्वत: संपून जाल.. आमच्या नादी लागू नका. क्लिप कशी मिळाली, काय तुमच्या जवळच्या एका व्यक्तीने दिली. तुम्ही कसं उपोषण केलं काय केलं याचीही चौकशी होणार आहे. शिंदे साहेबांनी जेवढं मराठ्यांना दिलं तेवढं आत्तापर्यंत कोणीच दिलं नाही, तुम्ही समाजाचं काम करता शिंदे साहेबांना खंबीर पाठिंबा द्यायला हवा होता, आमच्याकडंही क्लिप आहेत असं म्हणत रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांवरती मनेाज जरांगेंनी संताप व्यक्त केला. शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मोठा आरोप केला होता, मनोज जरांगे पाटील आंदोलनामध्ये झापेण्यासाठी कप सिरप घेतात, झोपण्यासाठी जरांगे पाईल या सिरपचा सेवन करत होते, असं म्हणत रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवले, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, तूच बाटली पिऊन बघ कशाची बाटली आहे तुला कळेल. तुझ्याकडेच बार आहेत, तुला त्याची चव कळते, एकेरी भाषेत बोलत जरांगेंनी रामदास कदमांना डिवचलंं आहे. तर हा शिवसेना संपवायला निघाला आहे, असंही पुढे जरांगेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही तुम्हाला विचारत आहोत तारीख कशी तुम्हाला माहिती झाली? ते देवेंद्र फडणवीस बघतील. तुम्हाल तारीख कशी माहिती झाली, ती क्लिप व्हायरल कशी झाली हे फडणवीसांना बघतील. तुम्हाला तारीख कशी माहिती झाली, ती क्लिप व्हायरल कशी झाली हे फडणवीसांना विचारा, मीडियावर धमकी देऊ नका, डोक्यात जाऊ नका. तू शिंदे साहेबांना संपवू नको, ती तारीख जूच सांगितली, का जूच आमचे लोक फोडले, जू मोघम बोलायला सुरू केलं तर मी देखील सुरू करणार. चिल्लर माणसासाखा वागायला लागला, असंही पुढे मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यसांना उद्देशून म्हटलं आहे.
तर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांग ेपाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, जरांगे सुपारी घेऊन काम करत असल्याचं योगेश कदमांनी म्हटलं, त्यावरप उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, तुझ्या म्हातार्याने काय केलं, तो कोणाची सुपारी घेतो तुझ्या घरीच सुपारी आहे. आम्हाला शिंदेंचा स्वाभिमान होता, म्हणून आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो, आमच्या सोबत गद्दार कोण होता ते सांग म्हणावं, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी पलटवार केला.
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना आहे. मी भिंती उभी करत नाही, हाच मराठ्यांमध्ये शिंदे विषयी गैरसमज जावा, शिंदे साहेबांना डॅमेज करावा हे स्वत: तो करत आहे. शंभर टक्के त्याला (रामदास कदम) एकनाथ शिंदे यांनी बोलायला सांगितले नाही. राज्यात आमच्या विरोधात आमच्या राहुन बरेच फोटो काढलेले दिसत आहेत. तू फोटोग्राफर होतास का असा सवालही जरांगे पाटलांनी रामदास कदम यांना केला. तर संजय राऊत तरी बरे आहेत. हे खूपच वेडं आहे. संजय राऊत एकदास सकाळी बोलतो, संजय राऊत इमानदार आहे जेल भोगली पण मागे हटला नाही असंही ते म्हणले.



Comments