top of page

अजित दादांनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ‘सोमश्वर’चा गड राखला21 पैकी 21 जागांवर दणदणीत विजय; बंडखोर जगताप सह युगेंद्र पवाराच्या पॅनलचा सुपडासाफ

4 hours ago
1 min read

बारामती: तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने 21 पैकी 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तिरंगी लढतीच्या निवडणुकीत सभासदांनी दिवंगत अजित दादा नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला आहे.


सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बंडखोरी करत भाजपच्या मदतीने स्वत:च पॅनल उभा केलेल्या पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला सभासदांनी धूळ चारली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पॅनलचा देखील दारुन पराभव झाला आहे.


बारामती तालुक्याती सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच ही संपूर्ण निवडणूक एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार पार्थ पवार यांनी दिली होती. 21 पैकी 21 जागा आमचा जिंकण्याचा प्रयत्न असल्याच पार्थ पवार यांनी म्हटलं होतं.

Comments


bottom of page