दिल्लीत इंडिया आघाडीची ‘सुप्रीम’ एकजूट; इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा विरोधीपक्षांच्या अभूतपूर्व एकजूटने दिल्ली दणाणली

नवी दिल्ली: मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात रणकंदन सुरू असतानाच सीजेपीनंतर आज इंडिया आघाडीच्या वतिने अभूतपूर्व मोर्चा सुप्रीम कोर्टावर काढण्यात आला. इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढतानाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांना भेटण्याची वेळ मागितली होती, मात्र सीजेआय सूर्यकांत यांनी भेटीची वेळ नाकारली. मोर्चाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या मोर्चामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली पोलिसांना घाम फोडणारी नेहा बोरा हिनेही सभाग घेतला होता. खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, तृनमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 11 पक्षांकडून सुप्रीम कोर्टामध्ये ज्ञानेश कुमार आणि एसआयआर विरोधामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली. बहुधा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा न भूतो न भविष्यती असा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकला.
या मोर्चाच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने देशभरातील काँग्रेसच्या खासदार-आमदारांना आज दिल्लीत बोलावले होते. मोर्चाच्या जवळपास 1 किलोमिटर अंतरामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी काही अंतर बसमधून, तर काही अंतर पायी पार केलं. काँग्रेश शासित राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विरोधी पक्षांचे नेते सुद्धा मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे इंडिया आघाडीची मोर्चामध्ये अभूतपूर्व अशी एकजूट दिसून आली. दिल्लीतील बाराखंबा मार्गापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढण्यात आला. बारखंबा येथून सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा काढणार्या राहुल गांधी यांना भगवान दास रोडवर थांबवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी तेथे बॅरिकेड्स लावून पुढील हालचाल रोखली, भगवान दास रोडवर निमलष्करी दल आणि उत्तर प्रदेश पोलिसांसह मोठ्या संख्येने पोलिस दल यामार्गावर तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, राहुल गांधीसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी आजच दूर करण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी रजिस्ट्रीला दिले आहेत, जेणेकरून ही याचिका उद्या सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाऊ शकेल. आयएनएस वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी या याचिकेवर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. मोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी 40 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षांचा मोर्चा हा शिव तांडवासारखा असून त्यात कोणीही सहभागी होऊ शकते. रविवारी, विरोधी खासदारांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहून निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला. मात्र, सरन्यायाधीशांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आणि याचिका दाखल करण्यास सांगितले.
लोकशाहीचे रक्षण करणे ही आमची जाबाबदारी : अखिलेश यादव म्हणले “ आंदोलन आणि धरणे सुरूच राहतील, लोकशाहीचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. भाजप निवडणुक आयोगाच्या संगनमताने संविधान आणि लोकशाही नष्ट करू इच्छितो. त्यांना कायम सत्तेत राहायचे आहे. ते बनावट मतदार याद्या तयार करतात, बनावट मते टाकतात आणि निवडणुकीच्या निकालांमध्ये फेरफार करतात. आंदेालनाचे ठिकाण बदलून सरकार स्वत:चा बचाव करू शकत नाही. किंवा कथित गैरप्रकार लपवू शकत नाही. आम्ही लोकशाहीसाठी आवाज उठवत राहू . संघर्ष सुरूच राहील.



Comments