top of page

मोदी, शहा यांच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही, ती उखडून टाकली पाहिजे; दिल्लीमधील आंदोलकांच्या डिटेनवरून ठाकरेंचा संताप, मोदी, शहा यांच्यावर सडकून टीका

5 hours ago
3 min read

दिल्लीतील जंतरमंतरवर मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टिका केली आहे. मोदी-शहा यांच्या मनात आणि डोक्यात पराकोटीची हुकूमशाही भरली असून, या बेबंदशाहीला देशातून खालपासून वरपर्यंत उखडून टाकले पाहिजे असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.


दिल्लीतील आंदोलन रोखण्यसाठी दिल्ली पोलिसांकउून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून, सरकार प्रश्न विचारण्याचा आणि सत्तेविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण, असा सवाल त्यांनी केला.


या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी "" No nation can be grateful at the cost of its liberty '' हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे, नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तर्‍हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.


हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय, कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे. या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून,

जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल अणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडून काढलं पाहिजे.


या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण? भ्रष्ट मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन 3 ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरू आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणार्‍या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.


देशात लोकशाही, हे कोणत्या तोंडाने सांगणार.. : आज दिल्लीत आंदेालनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत? देशातील 20,30 वर्षाचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी आमच्या देशात लोकाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत? ही असली लोकशाही? अशा शब्दात त्यांनी टीका केली.


मला समजत नाही ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रामुख्याने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय?

माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर अत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून, असा टोला राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांना लागावला आहे.


आंदोलक आणि महिला पत्रकारांच्या वागणुकीवर प्रश्न : दिल्लीतील आंदोलनादरम्यान मेट्रो, बस आणि इंटरनेट सेवांवर निर्बंध घालण्यात आल्याचा तसेच आंदोलकांना आंदोलनस्थळी पोहोचण्यापासून रोखण्यात येत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. तरुण-तरुणी आपल्या भविष्याबाबत अस्वस्थ असल्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


आंदोलनाचे वर्तांकन करणार्‍या महिला पत्रकारांनीही पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. आंदोलकांना ताब्यात घेताना त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.


भारतीय राज्यघटनेतली कलम 19(1) (अ) आणि 19(1)(ब) यांचा उल्लेख करत त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि शांततेत एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या अधिकारावर भर दिला. आंदोलकांना रोखण्यासाठी एवढ्या कठोर उपाययोजना करण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी केला.


‘ तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही’ : राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये मोदी-शहा यांच्या सत्ताकरणावर टीका करताना इतिहासाचाही संदर्भ दिला. मुघल, पोर्तुगीज आणि ब्रिटिश सत्तेविरोधात भारतीय जनतेने संघर्ष केला, याची आठवण करून देत सत्तेचा माज करणार्‍यांना जनता योग्या वेळी उत्तर देऊ शकते, असे त्यांनी म्हटले.


नेटप्लिक्सवरील " How to Become a Tyrant ' या महितीपटाचा उल्लेख करत त्यांनी अमित शाह यांच्यावर उपरोधिक टीका केली. त्याऐवजी महात्मा गांधी यांच्या शांततापूर्ण आंदोलनांचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. “ तुमच्याकडे सत्तेचा अमरपट्टा नाही, असे म्हणत सत्ताधार्‍यांनी आपण कायम सत्तेत राहणार असल्याचा समज करून घेऊ नये, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. सरकारकडून परिपक्वतेची अपेक्षा असते आणि ती नसेल, तर ती आत्मसात केली पाहिजे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

Comments


bottom of page