42 न्यायमूर्तींच्या पत्रावर वडेट्टीवारांचा घणाघात मोदी सरकारच्या इशार्यावर हे सर्व चालू असल्याच गंभीर आरोप

जालना: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वरिष्ठ अधिकार्यांनी एकत्र येत देशवासियांच्या नावे खुले पत्र जारी करत, ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, थेट भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. हे सर्व मोदी सरकारच्या इशार्यावर हे सर्व करत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी, केंद्रीय मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ 42 माजी न्यायमूर्ती आणि वरिष्ठ अधिकार्यांनी देशाला लिहिलेल्या खुल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हे सर्व मोदी सरकारच्या इशार्यावर हे सर्व करत आहेत. या न्यायाधीशांना थोडी तरी देशाच्या संविधानाची चिंता असती, अक्षम्य चिंता असती, तर त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या पापावर पांघरून घालण्याचे काम केले नसते.
मोदी सरकारच्या मर्जीने कदाचित यांच्या नियुक्त्या झाल्या असतील, असा घणाघात करताना, ज्ञानेश कुमारांचे संविधान विरोधी कृतीचे समर्थन करून अराजकता माजवत आहात. तुम्ही चोराला साथ का देत आहात? याचा अर्थ असा आहे तुम्ही चोरांच्या बरोबर तुम्ही सुद्धा मिळून आहात, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी पत्र लिहिणार्या त्या 42 अधिकार्यांवर केला.
जालना येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चात काँग्रेस नेते मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाचे नंतृत्व केले. जालना शहरातील गांधी चमन येथे आंदोलन झाल. सरकार विरेधात घोषणाबाजी करताना, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
विजय वडेट्टीवार यांनी, ज्ञानेश कुमार यांनी देशातील 13 कोटी मतदार कमी केले, हे सर्व मतदार विरोधकांचे होते. या देशातील लोकशाहीवर आणि संविधानावर ज्ञानेश कुमारने दरोडा टाकला. ज्ञानेश कुमार मोदी सरकारचा दलाल म्हणून वागत आहे. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पाच फेर्यांमध्ये मागे होते. दोन तास मतमोजणी प्रक्रिया थांबवली आणि त्यांना बढत दाखवली, कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुक हरले असते, असा घणाघातही त्यांनी केला.



Comments