top of page

पुन्हा आम्हीच जिंकणार: 2029 मध्ये 4 पराभवाच्या तयारीत रहा केंद्रीय मंत्री अमित शाह याचा राहुल गांधीवर हल्लाबोल

5 hours ago
2 min read

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पोटनिवडणुकांमधील काँग्रेसच्या अलीकडील पराभवांवरून काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. निवडणुक मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (एसआयआर) पराभवासाठी जबाबदार धरण्याऐवजी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असं म्हणत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.


गुजरामध्ये काँग्रेसला गेल्या 41 वर्षात एकही निवडणूक जिंकता आलेली नाही, असा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला. मतदार आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा देत असल्याचंही शाह यावेळी म्हणाले.


पोटनिवडणुकांचे निकाल आणि गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील भाजपच्या कामगिरीवर बोलताना अमित शाह यांनी ही टीका केली. राहुल गांधी निवडणुक आयोग आणि मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या आंदोलनात सहभागी झाले होते.


शाह म्हणाले, मला हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे आणि विशेषत: राहुलजीपर्यंत पोहोचावयाचा आहे की, काँग्रेस पक्षाने गेल्या 41 वर्षात एकही निवडणुक जिंकलेली नाही. त्यांनी शेवटची निवडणुक 1985 मध्ये जिंकली होती. त्यानंतर गुजरातमध्ये त्यांना सातत्याने पराभवाचा सामाना करावा लागला आहे. काँग्रेसच्या वारंवार होणार्‍या निवडणुक पराभवांचा संबंध 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनशी आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये निवडणुका हरत असल्यामागे एसआयआर हे कारण आहे का, याचे राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे. एसआयआरला दोष देण्याऐवजी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असंही शाह म्हणाले.


अमित शाह राहुल गांधी यांच्यावर टिका करताना म्हणाले, 2029 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसने आतापासूनच तयार रहावे, मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला विरोध करण्याच्या नावाखाली राहुल गांधी वारंवार खोट्या गोष्टी पसरवत असून घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप शाह यांनी केला.


गुजरातमध्ये भाजपच्या कामगिरीचा उल्लेख करताना अमित शाह म्हणाले, तीन नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाने निर्णायक विजय मिळवला आहे. शाह यांच्या म्हणण्यानुसार, दोन नगरपालिका आणि एका महानगपालिकेतील एकूण 104 जागांपैकी भाजपने 90 जागा जिंकल्या. त्यांच्या मतदारसंघात येणार्‍या गांधीनगर महानगरपालिकेत भाजपने 44 पैकी 38 जागांवर विजय मिळवला. आम आदमी पनिे सर्व 32 जागांवर निवडणुक लढवली, मात्र प्रत्येकी जागेवर पक्षाची अनामत रक्कम जप्त झाल्याचा दावाही शाह यांनी केला.


या निकालांधमून गुरजरामधील मतदारांचा कल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा पाठिंबा दिसून येत असल्याचं शाह म्हणाले. गुजरातमधील हा प्रचंड विजय राज्यातील मतदारांचा कल दर्शवतो. गुजरातमधील मतदार नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे यातून स्पष्ट होते.


मागील निवडणुकीच्या तुलनेत गांधीनगर महानगरपालिकेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 10 टक्के गुणांची वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरामध्ये जनता आजही मोदी आणि भाजपला पाठिंबा देत असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते.

अमित शाह यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या पराभवांचाही उल्लेख केला. पक्षाच्या कामगिरीमागील कारणांचा काँग्रेसने शोध घ्यायला हवा, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यापासून काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा समाना करावा लागत असल्याचे शाह म्हणाले. दुसरीकडे एसआयआरची प्रक्रिया 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच सुरू झाली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


राहुल गांधी यांनी निवडणुका मागून निवडणुका का हारत आहेत, याचे आत्मपरीक्षण करावे. मतपत्रिकांचा वापर होत असतानाही काँग्रेसला निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला होता, असेही त्यांनी नमूद केले. काँग्रेसवर नकारात्मक राजकारण केल्याचा आरोप करत शाह यांनी या पक्षाला “ लोकशाहीविरोधी” आणि ‘ संविधानविरोधी’ असं संबोधलं.


पोटनिवडणुकांधमील पराभव हा राहुल गांधी यांच्यासाठी धडा ठरायला हवा, असं शाह म्हणाले. देशातील जनता मोदी आणि भाजपच्या पाठीशी असल्याचाही त्यांनी दावा केला. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील भाजपच्या कामगिरीचाही शाह यांनी उल्लेख केला. तेथे पक्षाला मोठे बहुमत मिळाल्याचा दावा त्यांनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोप्रियता राहुल गांधी यांना स्वकारता येत नसल्याचा आरोप करत निवडणुकांमधील पराभवांपैकी एसआयआरला जबाबदार धरण्याऐवजी काँग्रेसने आपल्या निवडणुक कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे असंही शाह म्हणाले.


Comments


bottom of page