देशात ‘लॉ’ आहे पण ‘ऑर्डर’ नाही, जेलमधून बाहेर काढून फटकावयाला पाहिजे- राज ठाकरेटायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल

मुंबई: अभिनेते टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात संध्याकाळच्या सुमारास राजरोसपणे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सुदैवाने टायगर बचावला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर काही वेळातच लॉरेन्स बिष्णोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच, सलमान खानसोबत मैत्री असलेल्याना इशाराही दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांनी अटक केली असून आत्तापर्यंत 10 जणांना गजाआड करण्यात आलं आहे. आता, या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भूमिका मांडली आहे.
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर सरकारने तातडीने कारवर्इाकरत पोलिस यंत्रणा कामाला लावली होती. पोलिसांनीही वेगाने तपास करत तिन्ही हल्लेखोरांना राजस्थानच्या कोटा शहरातून अटक केली. मात्र, हल्ल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियातून लॉरेन्स बिष्णोई गँगने हल्ला केल्याची माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे, गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेल्या ऑरेन्स बिष्णोई गँगकडून खुलेआम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली जात असल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता राज ठाकरेंनीही सरकारला प्रश्न केला आहे.
लॉरेन्स बिष्णोई आणि टायगर श्रॉफवरील हल्ल्यासंदर्भातील प्रश्नावर राज ठाकरेंनी मिश्कील उत्तर देत सत्ताधार्यांना परखड सवालही केला. आज मला ती लाईन आठवते आहे, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.. असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्यांना टोला लगावला. सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे, भाजप विरोधात असताना अशा घटना झाल्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं? विरोधात असताना भूमिका वेगळी, सत्तेत आल्यावर भूमिका वेगळी, असे म्हणत भाजप नेत्यांनाही राज ठाकरेंनी फटकारलं. आम्ही केलं असं सांगत आहेत ते, मात्र बंदोबस्त होत नाही. जेलमधून बाहेर काढत त्याला फटकवायला पाहिजे, भीती नाही, मग तुम्ही पोसत आहात का त्यांना? असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी विचारला.
देशात लॉ आहे पण ऑर्डर नाही. माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे, शून्य लेव्हलला ते क्राईम रेट आणतील. राजकीय इन्टरफिअरन्स बंद झाला पाहिजे, गेल्या काही वर्षात देशातील गोष्टी साचलेल्या आहेत, फार काही काळ दबून राहू शकत नाही. आज जी बातमी फुटली ती आली. पत्रकारांचा देखील राग आहे, विद्यार्थी गृहिणी यांचा देखील राग आहे, प्रत्येकाचा राग आहे, तो बाहेर येणार. उगाच कोणी आगी लावत फिरत नाही, रावणाची लंका उगाच नव्हती जळली, असे म्हणत देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये राग असल्याचं राज ठाकरे म्हणाले.



Comments