top of page

ऑडिओ क्लिप खरी, पळवाट शोधण्याचा प्रयत्न ? फडणवीस, शिंदेंनी रामदास कदमांनाच विचारावं तपास लागणार - जरांगे पाटील

1 hour ago
1 min read

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपये दिल्याची ऑडिओ क्लिपने राज्याच्या महायुती सरकारमध्ये आरोप- प्रत्यारोप करण्यात येत आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे) गटामध्ये भडका उडाला असताना जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहेे. रामदास कदम यांनी आगोदर प्रसे घेवून हिच क्लिप व्हायरल केली त्यामुळे मुख्यमंत्री फडणवसी, एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना विचारावे खरा प्रकार समोर येईल असा दावा केला आहे.


जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत 500 कोटीच्या ऑडिओ क्लिप बाबत मोठा दावा केला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, ही ऑडिओ क्लिप खरी आहे, पण आता पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑडिओ क्लिपची चौकशी, तपास याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ रामदास कदम यांना विचारावं, कारण रामदास कदम यांनी मला पत्राकर घेण्यापूर्वी दोन तास आगोदर त्यांनी व्हायरल केली. शिवाय रामदास कदम यांनी क्लिपची तारीखही सांगितली. ज्या आर्थी रामदास कदम यांनी तारीख सांगितली त्या आर्थी रामदास कदम यांना माहिती आहे क्लिप कोणी दिली


क्लिप खोटी ठरवण्यासाठी आता दिल्ली वार्‍या सुरू होतील, दिल्ली वार्‍या सुरू झाल्याची माहितीही आहे. शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या लोकांचं माझ्या विरोधात षडयंत्र सुरू आहे. माझ्याकडं आणखी अनुबॉम्ब (क्लिप) आहे. वेळीच हे रोखावं अन्यथा आणखी शिल्लक असलेला अनुबॉम्ब महिनभरात व्हायरल केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

समाजातील फितूरी रोखण्यासाठी लवकरच गावापातळीवर मराठा सेवकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ऑडिओ क्लिपची सत्यता बाहेर काढा अन्यथा आम्ही समजू की यामध्ये तुमचा हात आहे. असा इशराही त्यांनी यावेळी दिला.

Comments


bottom of page