top of page

स्फोट झाला,मग कागदं का जळाली नाहीत, ऐनवेळी पायलट का बदलले? अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार आमोल मिटकरींचे आक्षेप!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार मिटकरी यांनी संशय व्यक्त करत काही आक्षेप घेतले आहेत, अपघातस्थळी माळरानावर काही कागदं पडलेली होती, स्फोट झाला मग कागदं का जळाली नाहीत असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी आक्षेप घेतला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबद अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात असून चौकशीची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) विधान परिषदेचे आमदार आमोल मिटकरी यांनी आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार मिटकरी यांनी ओडीशामधील राऊरकेला येथील विमान अपघाताचा दाखला देत मिटकरी म्हणाले की, माळरानावर जी कागदं पडेली होती, दादांचं विमान जे क्रॅश झालं त्या दिवशी कागदं ती कागदं जळलेल्या अवस्थेत का दिसली नाहीत. तिथून माझ्या मनात शंकेची पाल चुकचूकली. त्याच वेळेस मला बातमी अशी आली होती की, ओडीशामध्ये राऊलकेला विमान हादसा झाला आणि नऊ सिटर विमान होतं. सहा लोक त्याच्यामध्ये होते.


विमान क्रॅश झालं त्यात कुठं स्फोट वगैरे झाले नाहीत पण विमानाची समोरची बाजू जमिनीत कुचली. त्यानंतर माझ्या ज्या शंका होत्या की.विमान क्रॅश होण्याच्या पहिल्या दिवशी दोन दिवसाचा प्रोग्राम अजित दादांचा होता. त्यादिवशी नऊ नंतर दादांना पक्षातले लोकं भेटलेले आहेत. दादा त्यांना सर्वांना भेटले आणि रात्री मग 10:00 वाजता दादांनी ठरवलं होतं की बायरोड जायचं, तर मग ऐनवेळेवर तो निर्णय कसा घेण्यात आला.की , विमानानं जाऊ. दुसर्‍या दिवशी सकाळी दादा ज्या विमानाने जाणार होते त्याचे पायलट दोनदा कसे बदलले गेले? असे अक्षेप घेत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित दादांच्या विमान अपघाताची चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Comments


bottom of page