top of page

आयुुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचे कौतुक; मात्र माजी राज्यमंत्र्यांची मागणी अजब


अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच बुलढाण्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी त्यांच्या कामाचे कौतुुक करत एक अजब मागणी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पत्र पाठवून तुकाराम मुंढे यांचे रक्त राज्यातील सर्व खात्याप्रमुखांना द्यावे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रेते, भेसळ करणारे व्यावसायिक, हॉटेल चालक आणि औषध विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभाग अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे राज्यभरातून स्वागत होत आहे.


या पर्श्वभूमिवर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून खोचक शब्दांत प्रशासनातील इतर अधिकार्‍यांवरही निशाना साधला आहे,. “ ज्या पद्धतीने अशक्त रुग्णाला रक्त दिल्यानंतर त्याला नवी उर्जा मिळते त्याचप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्या रक्ताचा अंश सर्व विभाग प्रमुखांना दिल्यास त्यांनाही प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करण्याची प्ररणा मिळेल” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तुकाराम मुंढे ज्या प्रमाणे काम करत आहेत तसंच काम आपणांसह सर्व खातेप्रमुखांनी करावं अशी जनतेची भावना आहे. मात्र तसं होताना दिसत नाही असंही त्यांनी या पत्रात म्हटले.दरम्यान सावजी यांच्या पत्रामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आल अले असून यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page